पिवळ्या सोयाबीनची आवक वाढली, मंगरुळपीरमध्ये मिळाला 6,000 रु दर, भाव आणखी कडाडणार का?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
soyabean bajarbhav : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये 26 आणि 27 नोव्हेंबर 2025 रोजी आलेल्या सोयाबीनच्या भावांमध्ये मोठा चढ-उतार पाहायला मिळाला आहे.
advertisement
आजचा दर काय? 27 नोव्हेंबर रोजी जळगाव बाजार समितीत लोकल जातीला 4375 ते 4511 रुपये दर मिळाला तर सरासरी दर 4400 रुपये होता. नागपूर बाजारात मोठी आवक असून सुद्धा दर 3700 ते 4575 रुपयांदरम्यान राहिला. चाकूर बाजारात पिवळ्या जातीला 4251 ते 4600 रुपये असा मजबूत दर मिळाला आणि सरासरी 4475 रुपये प्रति क्विंटल दर नोंदवला गेला.
advertisement
advertisement
advertisement
मंगरुळपीर बाजारसमितीमध्ये मिळाला सर्वाधिक दर - विदर्भातील वाशीम आणि मंगरुळपीर येथे सोयाबीनला सर्वाधिक दर मिळाला. वाशीम बाजारात पिवळ्या सोयाबीनचा जास्तीत जास्त दर 6000 रुपये नोंदवला गेला आणि सरासरी दर 5500 रुपये राहिला. मंगरुळपीरमध्येही जास्तीत जास्त दर 5650 रुपये मिळाला, तर सरासरी दर 5500 रुपये होता.
advertisement


