advertisement

महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारकडून सर्वात मोठा दिलासा

Last Updated:

'किंमत समर्थन योजने'अंतर्गत (PSS) सुमारे 2,696 कोटी रुपयांच्या निधीतून तूर खरेदी केली जाणार आहे.

तूर
तूर
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, राज्यातील 3.37 लाख मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंजुरी दिली आहे.
नवी दिल्ली येथे पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे 'किंमत समर्थन योजने'अंतर्गत (PSS) सुमारे 2,696 कोटी रुपयांच्या निधीतून ही तूर खरेदी केली जाणार असून, याचा थेट लाभ राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे. या बैठकीस महाराष्ट्राचे पणन मंत्री जयकुमार रावल आणि केंद्रीय कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
advertisement
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे. तूर खरेदीच्या या निर्णयामुळे केंद्रावर मोठा आर्थिक भार पडणार असला, तरी शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळणे ही सरकारची प्राथमिकता आहे. ही खरेदी प्रक्रिया नेफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) या संस्थांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या समन्वयाने राबवली जाईल, असे मंत्री चौहान यांनी स्पष्ट केले.
advertisement
खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचनाही मंत्र्यांनी यावेळी दिल्या. शेतकऱ्यांची नोंदणी करताना कोणतीही अडचण येऊ नये आणि बिचौलियांचा हस्तक्षेप पूर्णपणे थांबवावा, असे निर्देशही त्यांनी दिले. तसेच, शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी गरजेनुसार खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. या प्रक्रियेमुळे थेट शेतकऱ्यांकडून खरेदी केली जाणार असून, व्यापाऱ्यांऐवजी मूळ उत्पादकांपर्यंत सरकारचा पैसा पोहोचणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारकडून सर्वात मोठा दिलासा
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement