advertisement

निष्ठावंतांना तिकीटं का नाही? राजन साळवींना शिवसैनिकांचा घेराव, धाराशिवमध्ये राडा

Last Updated:

Dharashiv Rajan Salvi: निष्ठावंतांना तिकीट का दिली नाहीत? असे विचारीत शिवसैनिकांनी शिंदेसेनेचे नेते, खासदार राजन साळवी यांना घेराव घालून जाब विचारला.

राजन साळवी
राजन साळवी
बालाजी निरफळ, प्रतिनिधी, धाराशिव : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे धाराशिव जिल्हा पक्ष निरीक्षक राजन साळवी यांना जाब विचारतानाची एका कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. तिकीट देणार नसतील तर चादर सतरंजी द्या, निवांत झोपतो, अशा शब्दात त्याने आपल्या उद्विग्न भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच तिकीट वाटपाच्या मुद्द्यावरून शिवसैनिकांनी त्यांना घेराव घातला.
शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे एबी फॉर्म राजन साळवी यांनी भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील आणि मल्हार पाटील यांना देत वाटप केल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेचा कार्यकर्ता आणि राजन साळवी यांच्यातील वादग्रस्त कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर आता पुन्हा राजन साळवी यांच्यावरील नाराजीतून शिवसैनिकांनी त्यांना घेराव घातला.

निष्ठावंतांना डावललं, राजन साळवींना शिवसैनिकांचा घेराव

advertisement
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत निष्ठावंतांना डावलल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. अविनाश खापे नामक शिवसैनिकाने राजन साळवी यांना फोन करून जाब विचारला. तसेच निष्ठावंतांना तिकीटे द्यायची नसतील आम्हाला खुशाल सांगा, आम्हाला चादर-सतरंजी द्या आम्ही निवांत झोपतो, असे म्हणत त्याने आपल्या उद्विग्न भावनांना वाट मोकळी करून दिली.

राजन साळवींवर शिवसैनिकांच्या प्रश्नांच्या फैरी

advertisement
राजन साळवी आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. राणा पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांच्याकडे शिवसेनेचा एबी फॉर्म गेलाच कसा? तुम्हाला निष्ठावंत दिसत नाही का? तुम्ही निष्ठावंतांना तिकीटे देणारच नाही का? अशा प्रश्नांच्या फैरी अविनाश खापे यांनी राजन साळवी यांच्यावर झाडल्या. तसेच शिवसैनिकांनी देखील त्यांना घेराव घालून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत वाटप केलेल्या तिकीटावर नाराजी दर्शवली.
advertisement

शिवसैनिकांनी घेराव घातला, राजन साळवींची अडचण झाली

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत निष्ठावंत शिवसैनिकांना डावल्याने शिवसैनिक आक्रमक झाले. तिकीट वाटपावरून आम्ही विचारलेल्या प्रश्नांची आम्हाला उत्तरे द्या, असे म्हणत शिवसैनिकांनी आक्रमकपणे साळवी यांना विचारले. शिवसैनिकांनी घेराव घातल्याने साळवींची चांगलीच अडचण झाली होती.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
निष्ठावंतांना तिकीटं का नाही? राजन साळवींना शिवसैनिकांचा घेराव, धाराशिवमध्ये राडा
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement