Agriculture News : सांगा, शेतकऱ्यानं काय करायचं? 'तो' आला अन् सगळं घेऊन गेला, काढलेलं पिक जागेवर कुजलं!
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
यामुळे सोंगणी करून टाकलेल्या मका आणि सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
advertisement
advertisement
राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून अनेक भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुढील 24 तासांत अनेक भागांमध्ये मुसळधार अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यातून मान्सून गेला असला तरीही पुढील काही दिवस राज्यात पावसाचे ढग कायमच राहणार आहेत. 31 ऑक्टोबरपर्यंत पाऊस असणार आहे, असे हवामान अंदाजानुसार वर्तविण्यात येत आहे.
advertisement
advertisement
advertisement
आता मकाच्या कंसाला कोंब फुटू लागले त्यामुळे मका आता मशीनमधून काढता सुद्धा येणार नाही आणि माझ्या चिकूच्या बगीच्यात अवकाळी पाऊस पडल्याने झाडाला लागलेला पूर्ण फळबाग जमीनदोस्त झालेली आहे. मागच्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आता उत्पन्नाची आशा मावळली आहे. माझ्या शेताचा पंचनामा करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा माझ्याकडे शेतकरी म्हणून आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी भावना शेतकरी सतीश लोखंडे यांनी व्यक्त केली.
advertisement
मी यावर्षी शेतामध्ये सोयाबीनची लागवड केली होती. जवळपास एक एकर सोयाबीन पेरले होते. त्या जवळपास 15000 रुपये लागवडीचा खर्च झाला होता. सोयाबीनचे उत्पन्न हे चांगले होणार होते पण या मागच्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि रात्री पडलेल्या पावसामुळे पूर्ण माझी सोयाबीन पाण्याखाली आलेली आहे. सोयाबीनला कोंब येऊ लागले त्यामुळे झालेले नुकसान हे भरून निघणार नाही. कृषी विभागाने त्वरित पंचनामा करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी तेजस देशमुख यांनी केली.











