advertisement

शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या काँग्रेस गवताचा शेतातून करा कायमचा नायनाट, ते कसं?

Last Updated:
Congress Grass :  शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठ्या त्रासांपैकी एक म्हणजे वेगाने पसरत जाणारे आणि नष्ट करणे कठीण असलेले काँग्रेस गवत. काही भागांत याला ‘गाजर गवत’ असेही म्हणतात.
1/5
agriculture news
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठ्या त्रासांपैकी एक म्हणजे वेगाने पसरत जाणारे आणि नष्ट करणे कठीण असलेले काँग्रेस गवत. काही भागांत याला ‘गाजर गवत’ असेही म्हणतात. पिकांचे नुकसान, जमिनीची सुपीकता कमी करणे, जनावरांचे आरोग्य बिघडवणे आणि माणसांमध्ये त्वचारोग, दमा यांसारखे आजार निर्माण करण्याची क्षमता असल्यामुळे हे गवत अत्यंत घातक मानले जाते. शेतीतील अनेक समस्यांबद्दल शेतकऱ्यांना माहिती नसली तरी काँग्रेस गवताचे नाव लहान मुलांनाही ठाऊक असते. मात्र हे गवत भारतात प्रथम कधी दिसले, कुठून आले आणि याचा नायनाट कसा करायचा, याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
2/5
agriculture
कृषी संशोधकांच्या माहितीनुसार, काँग्रेस गवत भारतात सर्वप्रथम 1956 साली पुणे येथे आढळले. त्यानंतर या गवताचा प्रसार वेगाने सुरू झाला आणि काही वर्षांतच हे संपूर्ण देशभर पसरले. हे गवत मूळचे मेक्सिको, अमेरिका, त्रिनिदाद आणि अर्जेंटीना या देशांतील आहे. धान्यांमध्ये मिसळून आलेल्या बियांमुळे अमेरिकेतून हे गवत भारतात आल्याचे मानले जाते. सुरुवातीला मोजक्या माळरानांवर दिसणारे हे तण आज पिकांच्या शेतात, फळबागांत, रस्त्यांच्या कडेने आणि जंगलातही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते.
advertisement
3/5
agriculture
या गवताला ‘काँग्रेस गवत’ हे नाव का पडले, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. कारण हे गवत जसे नष्ट करणे कठीण आणि पुन्हा पुन्हा डोकावणारे, तसेच देशातील काँग्रेस पक्षालादेखील त्याच्या सातत्यासाठी ओळखले जाते. त्या साधर्म्यावरूनच याला काँग्रेस गवत असे संबोधले गेले, असे मानले जाते. वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर या गवतामध्ये ‘सेस्क्यूटरपीन लेक्टोन’ नावाचे विषारी द्रव्य आढळते. यामुळे पिकांची वाढ खुंटते आणि शेतातील सुपीकता कमी होते. माणूस या गवताच्या संपर्कात वारंवार आल्यास त्वचेला सूज, खाज, ताप, दमा यांसारखे त्रास उद्भवू शकतात. दुधाळ जनावरांनी हे गवत खाल्यास दूध उत्पादनात घट होते.
advertisement
4/5
agriculture
काँग्रेस गवत कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर आणि वातावरणात वाढू शकते. याची पांढरी फुले दिसू लागली की त्यानंतर ते हजारो बिया तयार करते. एका झाडावर 5,000 ते 25,000 पर्यंत बियाणे तयार होऊ शकतात. ही बिया अत्यंत हलकी असल्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर वा वाऱ्याच्या झुळुकीने दूरवर पसरतात. त्यामुळे हे गवत नियंत्रित करणे अवघड ठरते. रासायनिक तणनाशकांचा वापर या गवतावर फारसा प्रभावी ठरत नाही. शेतकरी राउंडअपसारखे तणनाशक वापरून पाहतात, परंतु काही काळाने हे गवत पुन्हा वाढू लागते.
advertisement
5/5
agriculture
या गवतावर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे बियाणे येण्यापूर्वी संपूर्ण झाड मुळासकट उपटून काढणे. असे उपटलेले गवत एका जागी जमा करून त्याचे सेंद्रिय खत तयार करता येते. विघटनाच्या प्रक्रियेत या गवताच्या बिया नष्ट होतात, त्यामुळे याचा पुढील प्रसार होत नाही. तयार झालेले खत पिकांसाठी सुरक्षित असून त्यातून आवश्यक पोषकद्रव्ये मिळतात. त्यामुळे जिथे जिथे हे गवत दिसेल, तिथे लगेच त्याचा नायनाट करून त्याचे सेंद्रिय खत तयार करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञ देतात. यामुळे पिकांचे उत्पादन वाढेल आणि शेतातील काँग्रेस गवताचा उपद्रवही कमी होईल.
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement