..अन्यथा PM Kisan चा 22 वा हप्ता मिळणार नाही! शेतजमिनीसंदर्भात हे काम शेतकऱ्यांना करावं लागणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
PM Kisan Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची योजना मानली जाते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2,000 रुपयांचा हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची योजना मानली जाते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2,000 रुपयांचा हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी दिला जाणारा हा आधार मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरतो. दरम्यान, या योजनेचा 22 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यास अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे PM किसान योजनेत नोंद असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी तातडीने आपली कागदपत्रे आणि पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.
advertisement
advertisement
<strong>जमिनीची पडताळणी महत्वाची -</strong> PM किसान लाभ मिळण्यासाठी लागवडीयोग्य जमिनीची पडताळणी करणे अनिवार्य आहे. शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची सत्यता तपासण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. जर जमीन पडताळणी वेळेवर झाली नाही, तर संबंधित शेतकऱ्याचा हप्ता रोखला जाऊ शकतो. म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या गावातील तलाठी किंवा संबंधित महसूल विभागाकडे जाऊन ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी.
advertisement
advertisement


