Aajache Rashibhavishya: दुर्गा देवीची कृपा होणार, मंगळवारी या राशींचं नशीब पालटणार, मेष ते मीन आजचं राशीभविष्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Horoscope Today: आज 23 सप्टेंबर रोजी मंगळवार आणि नवरात्रची दुसरी माळ आहे. आजच्या दिवशी दुर्गा देवीची सर्व राशींवर कृपा असेल. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.
मेश राशी - आपली उद्दिष्टे अपेक्षा पूर्ण होण्यासाठी खाजगी संबंधांचा वापर आपल्या पत्नीस आवडणार नाही. आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. क्रिएटिव्ह कामामध्ये स्वत:ला गुंतवा. दिवसाची सुरवात जरी थोडी थकवणारी राहील परंतु, जसे जसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
advertisement
मिथुन राशी - कोणाबद्दलही त्वरित निर्णय घेऊन त्यांच्या हेतूबद्दल शंका घेऊ नका. तुमच्या जोडीदाराची एक विस्मयकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. अन्य देशांतील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. हाती घेतलेले कामे मार्गी लागतील. आज तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा असणार आहे.
advertisement
कर्क राशी - पैसे मिळविण्याच्या नव्या संधी लाभदायक असतील. नवीन प्रकल्पात हात घालण्याअगोदर तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. एक उत्तम दिवसापैकी एक दिवस आहे आज तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचा बॉस ही तुमच्या कामाने आनंदी होईल. व्यावसायिक ही आज व्यवसायात नफा कमावू शकतो. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
सिंह राशी - अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. तुमचे जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील त्या लोकांच्या मध्ये राहू नका ज्यांच्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही आणि चुकीच्या आहेत. असे करणे भविष्यात तुम्हाला समस्यांच्या व्यतिरिक्त काही देणार नाही. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग आकाशी असणार आहे.
advertisement
कन्या राशी - व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. व्यापारी भागीदार आपला फायदा घेतील. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
तूळ राशी - तुमच्या चपळाईच्या कृतीने तुमचे प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिलेले प्रश्न सुटतील. नको त्या ठिकाणी विचारपूर्वक धन खर्च करा. धन हानी होऊ शकते. कामकाज भराभर उरकण्यासाठी घाई केलीत तर सहकाऱ्यांना राग येऊ शकतो कोणतेही निर्णय घेण्याआधी इतरांची गरज काय आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. जोडीदार आज आनंदाची बातमी देणार. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
वृश्चिक राशी - आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. कोणाबद्दलही त्वरित निर्णय घेऊन त्यांच्या हेतूबद्दल शंका घेऊ नका, वेळेला महत्त्व द्या आजचा दिवस अत्यंत अविश्वसनीय असा असणार आहे. अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळीच धार देईल. आज तुमचा शुभ अंक 5 असून रंग हिरवा असणारा आहे.
advertisement
धनु राशी - आजच्या दिवशी चुकून ही कुणाला पैसे उधार देऊ नका आणि जर देणे खूपच गरजेचे असेल तर, देणाऱ्याकडून लिखित स्वरूपात लिहून घ्या की, तो पैसे परत केव्हा करेल. तुमच्या प्रेम जीवनात नवीन वळण येईल. तुमचा साथी आज तुमच्याशी विवाहाला घेऊन बोलणी करू शकतो. गोष्टींना योग्य प्रकारे समजण्याचा आज तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग आकाशी असणार आहे.
advertisement
मकर राशी - तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. आज कुणी न सांगता एक देणेदार तुमच्या अकाऊंट मध्ये पैसे टाकू शकतो हे पाहून तुम्हाला आनंद ही होईल आणि आश्चर्य वाटेल. आपल्या खऱ्या भावना नेमकेपणाने सांगणे योग्य ठरेल. कामाच्या ठिकाणचे आणि घरातील ताणतणाव तुम्हाल शीघ्रकोपी बनवतील. आज तुमचा शुभ अंक 2 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
कुंभ राशी - बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. कुटुंबातील समस्या सोडविण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकाल. खाजगी घडामोडी संपूर्ण नियंत्रणाखाली राहतील. तुम्ही काम करत असलेला एखादा दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो. नवीन व्यवसायासाठी उत्तम असा दिवस. आज तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा असणार आहे.
advertisement
मीन राशी - तुमच्या मनातील समस्या बाजूला सारा आणि घर तसेच मित्रमंडळींमध्ये तुमची स्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा. अविवाहित मंडळींना आज आनंदाची वार्ता लाभेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमच्या कामाला आज दाद मिळेल लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात, असं का म्हणतात, ते तुम्हाला आज कळेल. आज तुमचा शुभ अंक 9 असून रंग हा लाल आहे.
advertisement