February Horoscope 2025: नशिबाची साथ! फेब्रुवारी महिना या राशींना निराश नाही करणार; सहज प्रयत्नांना यश, धनप्राप्ती

Last Updated:
February 2025 Horoscope: 2025 हे नवीन वर्ष सुरू होऊन जानेवारी हा पहिला महिना संपतही आला. आता लवकरच फेब्रुवारी महिना सुरू होणार आहे. हा महिना काही राशींच्या व्यक्तींसाठी शुभ ठरणार आहे, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.
1/6
फेब्रुवारी महिन्यात 5 राशींच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होण्याची मोठी शक्यता असल्याचं ज्योतिषतज्ज्ञांचं म्हणणं आहे. कारण या व्यक्तींना धनप्राप्तीचे योग आहेत. फेब्रुवारी महिन्यात कोणत्या राशी लकी आहेत, त्याबद्दल जाणून घेऊ या. 

advertisement
2/6
धनू : फेब्रुवारी महिन्यात धनू राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती उत्तम राहण्याची शक्यता आहे. या व्यक्तींना धनसंचय करण्यात यश मिळू शकतं. म्हणजेच या राशीच्या व्यक्तींचा बँकबॅलन्स वाढेल आणि बचतीच्या नियोजनाला मजबुती मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ मिळू शकतो. आई-वडिलांच्या सहकार्यातून खूप मोठं आणि महत्त्वपूर्ण कार्य पूर्ण होऊ शकतं.

3/6
मेष : या महिन्यात बृहस्पती महाराज धनसंचयासाठी मदत करतील. या व्यक्तींचं उत्पन्न हळूहळू वाढत जाईल. एकापेक्षा अधिक माध्यमांमधून धनप्राप्तीचे योग तयार होण्याची शक्यता आहे. कोणाकडून कर्ज घेतलं असेल किंवा उधार पैसे घेतले असतील, तर या महिन्यात ते कर्ज यशस्वीरीत्या फेडण्याचं उद्दिष्ट ठेवाल. संपत्तीशी संबंधित काही प्रकरणं कोर्टात असली, तर त्यांचा निकालही मेष राशीच्या व्यक्तींच्या बाजूने लागू शकतो.

4/6
मकर : व्यापारातून धनलाभाचे योग आहेत. आधी कुठे पैसे गुंतवले असतील, तर या काळात मोठा नफा मिळू शकतो. नोकरदार व्यक्तींना या महिन्यात सुखप्राप्ती होईल. नवं वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता.

5/6
वृषभ : उत्पन्नात मोठी वाढ होईल. एकापेक्षा अधिक माध्यमातून धनप्राप्तीचे योग तयार होतील. आर्थिक स्थितीत सातत्याने सुधारणा होईल. खर्च कमी होतील; मात्र सुखसोयींच्या साधनांसाठी काही खर्च होऊ शकतात. बजेट तयार करा आणि खर्च करा.

6/6
वृश्चिक : या महिन्यात आर्थिक स्थिती मजबूत राहील. उत्पन्नात वाढ होईल. दर दिवशी उत्पन्न वाढेल. खर्चांवर नियंत्रण राहण्याची शक्यता आहे. शॉर्टकटच्या माध्यमातून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करू नका. नुकसान होईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement