Astrology: प्रचंड कष्टात दिवस काढले, आता सुख पाहाल! ऑगस्टच्या शेवटी 3 राशींचे नशीब उजळणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
August Horoscope: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह सुमारे 1 महिन्यानंतर आपली राशी बदलतो. त्याचा परिणाम व्यवसाय, शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेवर विशेषतः दिसून येतो. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी म्हणजे 30 ऑगस्ट रोजी व्यवसायाचा कारक बुध सिंह राशीत प्रवेश करणार आहे, त्यानं 3 राशीच्या लोकांचे नशीब चमकू शकते.
advertisement
advertisement
advertisement
धनू - बुध ग्रहाचा राशीतील बदल धनू राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. कारण हे संक्रमण तुमच्या राशीपासून नवव्या स्थानात असेल. त्यामुळे ऑगस्टच्या शेवटी तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. तसेच, या काळात तुम्ही देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करू शकता, त्यातून फायदा हाती लागेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या, हा काळ सर्जनशील किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी चांगला आहे. धार्मिक कार्यांमध्ये तुमची आवड वाढेल.
advertisement
मिथुन - बुधाच्या राशीतील बदल तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. कारण बुध तुमच्या राशीतून धन आणि वाणीच्या घरात जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच, व्यवसायात नफा, नोकरीत प्रगती आणि प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल. संवाद आणि माध्यमांशी संबंधित लोकांसाठी हा काळ विशेषतः चांगला राहील. बुध लग्नाचा स्वामी आहे आणि तुमच्या राशीतून चौथ्या भावात आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला वाहन आणि मालमत्ता सुख मिळू शकते.
advertisement
कन्या - व्यवसायाचा कारक बुधच्या राशीतील बदल, कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण बुध तुमच्या राशीचा स्वामी आहे. तसेच, बुध तुमच्या राशीतून बाराव्या भावात जाणार आहे. त्यामुळे, या काळात तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल. व्यावसायिक लोकांना ऑफिसच्या कामासाठी लांबचा प्रवास करण्याची संधी मिळेल, परंतु या काळात तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. या काळात तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील. तसेच, तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)