advertisement

Holi Horoscope: होळी-धूलिवंदनला नशीब जोमात! शुभ राजयोग या 4 राशींना आनंदाची बातमी देणार

Last Updated:
Holi Horoscope: हिंदू धर्मात फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होणारा होळीचा सण खूप खास मानला जातो. राज्यात या दिवशी गल्लोगल्ली होळी पेटवून तिची पूजा करून पुरण-पोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या प्रभावातून आयुष्यात बदल घडवून आणण्याची एक मोठी संधी असते. प्रसिद्ध ज्योतिषी कृष्ण कमलनाथ यांच्या मते, होळी 2026 च्या निमित्ताने पाच शक्तिशाली राजयोग तयार होत आहेत.
1/5
शुक्र, बुध आणि सूर्य या प्रमुख ग्रहांच्या त्रिकोणातील स्थितीमुळे मालव्य राजयोग, बुधादित्य योग, शुक्रादित्य योग, लक्ष्मी-नारायण योग आणि धनशक्ती योग असे पाच महायोग जुळून येत आहेत. या योगांच्या प्रभावामुळे धनदौलत, संपत्ती, पद-प्रतिष्ठा आणि प्रगतीच्या नवीन संधी चालून येणार आहेत. याचा परिणाम सर्व 12 राशींवर होणार असला तरी, चार राशींसाठी हा काळ खूपच खास ठरेल.

2/5
वृषभ - वृषभ राशीचा मालक शुक्र आहे आणि या वेळी शुक्र मजबूत स्थितीत असल्याने मालव्य राजयोग तयार होतोय. यामुळे तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस येतील. कमाईचे नवीन मार्ग मोकळे होण्याची शक्यता आहे आणि घरात एखादी गोड बातमी कानावर पडू शकते. जर तुम्ही नवीन गाडी किंवा घर घेण्याचा विचार करत असाल, तर तुमचे हे स्वप्न आता पूर्ण होऊ शकतं. तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा जास्त मजबूत होईल.

3/5
मिथुन - तुमचा राशीस्वामी बुध आहे. बुधादित्य आणि लक्ष्मी-नारायण योगामुळे तुमचं नशीब उजळणार आहे. तुमची समज आणि निर्णय घेण्याची ताकद वाढल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशनच्या संधी मिळतील आणि जे पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करतात त्यांना चांगला नफा होईल. थोडक्यात सांगायचं तर, पैशांच्या बाबतीत तुमची चांगली प्रगती होईल.

4/5
सिंह - सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्रादित्य आणि बुधादित्य योग खूपच फायदेशीर ठरणार आहेत. सूर्याच्या मजबूत स्थितीमुळे समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि तुमच्यातली नेतृत्व करण्याची ताकद लोकांच्या नजरेत भरेल. जे लोक सरकारी क्षेत्रात किंवा प्रशासकीय कामात आहेत, त्यांच्यासाठी हा यशाचा काळ आहे. नवीन कामं सुरू होतील आणि तुमचं नाव आणि प्रतिष्ठा दोन्ही वाढेल.

5/5
तूळ - शुक्राच्या अधिपत्याखाली असलेल्या तूळ राशीला मालव्य आणि लक्ष्मी-नारायण योगाचा मोठा फायदा होईल. आर्थिक बाबतीत तुम्हाला स्थिरता मिळेल. जे लोक कला, फॅशन किंवा ब्युटी क्षेत्रात काम करतात, त्यांना विशेष फायदा होणार आहे. खर्चावर तुमचं नियंत्रण राहील आणि तुमची बचत वाढेल. वैवाहिक आयुष्यात सुख आणि शांतता नांदेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement