खूप सारा पैसा, प्रत्येक क्षेत्रात प्रगती, जून महिना हा या 3 राशींच्या लोकांसाठी Golden time
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
आमच्या वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी एका ग्रहातून दुसऱ्या ग्रहासोबत युती करतात. याचा 12 राशींवर प्रभाव पाहायला मिळतो. ज्योतिषाचार्य पंडित पंकज पाठक यांनी याबाबत माहिती दिली. (दुर्गेश सिंग राजपूत/प्रतिनिधी, नर्मदापुरम)
advertisement
advertisement
वृषभ राशी : या राशीच्या लोकांसाठी गुरू आणि मंगळ ग्रहाची युती लाभदायी ठरणार आहे. कारण या राशीच्या लोकांच्या कुंडलीत ही युती तयार होणार आहे. या राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे. यामुळे त्यांना थांबलेले पैसे परत मिळू शकतात. सोबतच जे लोक सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना यश मिळेल. विवाहित व्यक्तीसाठी वैवाहिक जीवन चांगले असेल. यावेळी यांच्या मान सन्मानात वाढ होईल. त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. तसेच व्यवसायाशी संबंधित धनलाभ होईल.
advertisement
सिंह राशि : या राशीच्या लोकांसाठी गुरू आणि मंगळ ग्रहाची युती सिद्ध होईल. कारण राशी कर्म भावात ही युती तयार होत आहे. यामुळे या राशीच्या लोकांच्या व्यवसायात प्रगती होईल. बेरोजगारांना नोकरी मिळण्याचा योग आहे. व्यापाऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. त्यांच्या कार्यात त्यांना खूप यश मिळेल. तसेच मान सन्मानही वाढेल. या राशीच्या लोकांचे आपल्या वडिलांसोबत संबंध मजबूत होतील. यामुळे त्यांना पूर्वजांची संपत्तीही मिळू शकते.
advertisement
कर्क राशी : या राशीच्या लोकांसाठी ही युती फायदेशीर ठरणार आहे. या राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढणार आहे. पैशांची बचत केल्याने त्यांना लाभ होईल आणि व्यवसायातही फायदा होईल. यावेळी गुंतवणूक केल्याने फायदा होईल. याशिवाय प्रेमसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल. कुटुंबासह सामंजस्याची भावना तयार होईल. संततीशी संबंधित आनंदाची बातमी मिळू शकते.
advertisement