Astrology: अनंत अडचणींचा आल्या! आता या राशींचे मंगळ उजळणार भाग्य; सगळीकडून लाभाचे योग
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mangal Gochar 2025: ग्रहांचा सेनापती मंगळ दर 45 दिवसांनी आपली राशी बदलतो. त्याच्या सर्वोच्च राशीपासून सर्वात खालच्या (निम्न) राशीकडे प्रवास करतो. 21 जानेवारी रोजी मंगळाने आपल्या सर्वात निम्न राशी कर्क राशी सोडून मिथुन राशीत प्रवेश केला आहे. मंगळ नीच राशीत असल्यानं अनेक राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. पण मंगळ मिथुन राशीत प्रवेश करताच या राशीच्या लोकांचे नशीब अचानक चमकू शकते. मंगळाच्या नीचतेच्या समाप्तीमुळे, या राशींना भरपूर फायदे मिळू शकतात.
advertisement
advertisement
advertisement
सिंह - या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे मिथुन राशीत जाणे खूप खास असू शकते. या राशीच्या लोकांना त्यांच्या पालकांकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकतो. यासोबतच, वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. सुखसोयींमध्ये झपाट्याने वाढ होणार आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. यासोबतच शेअर बाजारात गुंतवलेले पैसेही वसूल करता येतील. आनंद तुमचे दार ठोठावू शकतो. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल.
advertisement
advertisement
तूळ - कुटुंब आणि मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला अनेक प्रवास करावे लागू शकतात. यातून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळवू शकाल. आयुष्यात सकारात्मकता वाढेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)