Shani Gochar: संकटांना पुरून उरणार, शनी आहे साथीला! या 4 राशींना सुखाचा दिवस, धनलाभ

Last Updated:
Saturn Return Into Purvabhadrapad Nakshatra : पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या पहिल्या चरणात शनिदेव पुन्हा परतले आहेत. ते या टप्प्यात 3 ऑक्टोबरपर्यंत मार्गक्रमण करतील आणि नंतर शतभिषा नक्षत्रात पोहोचतील. स्वराशी कुंभेत असताना शनिची ही स्थिती अनेक राशींवर विपरीत परिणाम करेल.
1/5
पण, काही राशींना शनिच्या या स्थितीचा जबरदस्त लाभ होण्याची शक्यता आहे. ज्योतिषी पंडित योगेश चौरे यांच्या मते, सध्या शनी कुंभ राशीत भ्रमण करत आहे आणि 29 जूनपासून शनी या राशीत वक्री स्थितीत आहे. यानंतर 15 नोव्हेंबरला कुंभ राशीतच सरळ मार्गी जातील. सध्याची शनिची स्थिती कोणासाठी फायदेशीर ठरणार आहे, याविषयी जाणून घेऊ.

advertisement
2/5
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री चाल आणि नक्षत्र बदल अत्यंत लाभदायक ठरणार आहे. या काळात नशीब तुमची साथ देईल आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तुमचे एखादे काम अडकले असेल तर ते या काळात पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, ते नक्कीच पूर्ण होईल. तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या गोष्टीने मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असाल तर तुम्हाला यातूनही आराम मिळणार आहे.

3/5
कुंभ - या राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. शनीची ही स्थिती तुम्हाला शुभ फळ देईल. आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर तुम्हाला त्यातून दिलासा मिळणार आहे. या काळात तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होणार आहे. या काळात कुंभ राशीच्या लोकांच्या बाराव्या घरात गुरूचा शुभ प्रभाव असल्यामुळे तुमचा खर्च कमी होऊ शकतो. तसेच, या दिवसांमध्ये तुम्हाला सुख आणि समृद्धी प्राप्त होऊ शकते.

4/5
तूळ - पूर्वाभाद्रपद नक्षत्रातील शनीचे संक्रमण तुमच्यासाठीही लाभदायक ठरणार आहे. तुमचे दुःख आता संपणार आहे आणि तुमचा चांगला काळ सुरू होईल. नोकरीत तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि व्यावसायिक असाल तर तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढणार आहेत. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत येणार आहेत. या काळात तुम्हाला चांगल्या मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

5/5
मकर - मकर राशीच्या लोकांना शनीची वक्री स्थिती आणि नक्षत्र बदलाचा सकारात्मक परिणाम दिसेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची हीच वेळ आहे. तुम्ही खूप आनंदी असाल आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होणार आहेत. नोकरी करत असाल आणि खूप दिवसांपासून त्यात बदल करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे. संधी मिळाल्यास बदल करा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement