advertisement

Weekly Horoscope: धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य; आनंदी-आनंदाचे क्षण पुन्हा, पूर्ण आठवडा..

Last Updated:
Weekly Horoscope: या आठवड्यात काही राशींना आर्थिक फायदा आणि नवीन जबाबदाऱ्यांमुळे समाजात मान-सन्मान वाढेल. घरगुती आयुष्य आनंदी राहील, जुने गैरसमज मिटतील आणि प्रेमसंबंधांमध्ये अजून गोडवा येईल. प्रवासातून फायदा होईल आणि गुंतवणुकीतून चांगलं फळ मिळण्याची शक्यता आहे. तुमची मेहनत आणि योग्य निर्णय भविष्यासाठी एक भक्कम पाया रचतील.
1/7
 धनु राशीच्या लोकांनी या आठवड्यात कोणताही मोठा निर्णय घेताना किंवा नवीन काम सुरू करताना नीट विचार करावा, नाहीतर नंतर पश्चाताप होईल. जुन्या चिंता आणि समस्या अजून सुटताना दिसत नाहीत. नोकरीच्या शोधात असलेल्यांना अजून थोडी वाट पाहावी लागेल. झटपट पैसा कमवण्याचे शॉर्टकट टाळा. सुरुवातीला आर्थिक व्यवहारात सावध राहा, नाहीतर नुकसान होऊ शकतं. बिझनेसमध्ये मध्यम निकाल मिळतील, त्यामुळे कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. जर तुमचा बिझनेस भागीदारीत असेल, तर जोडीदारावर आंधळा विश्वास ठेवू नका. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन लागणार नाही. नात्यांमध्ये संमिश्र अनुभव येतील.

2/7
धनु - या आठवड्यात दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा, कारण मित्र किंवा भावंडांकडून अपेक्षित मदत मिळणार नाही. दिलेला शब्द पाळता येत नसेल तर वचन देऊ नका. लव्ह लाईफमध्ये सावध राहा. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या, नाहीतर पोटाचे विकार त्रास देऊ शकतात.लकी कलर: निळा, लकी नंबर: 3

3/7
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नशीबवान असेल. सुरुवातीपासूनच तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रांत यश मिळेल. एखादी जुनी समस्या सुटल्यामुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. मित्र आणि परिवाराकडून चांगली मदत मिळेल. सरकारी कामात किंवा सत्ताधारी लोकांशी ओळख वाढेल. जमिनीचे व्यवहार बोलणी करून मार्गी लागतील. जर कोर्टात काही काम असेल, तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे.

4/7
मकर - आठवड्याच्या मध्यात एखाद्या धार्मिक किंवा शुभकार्यात सहभागी व्हाल. अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. व्यावसायिकांसाठी हा काळ नफ्याचा असेल. परदेशी व्यापारात मोठा फायदा होईल. नोकरीत सहकारी आणि वरिष्ठांची हवी ती साथ मिळेल. तुम्ही नियोजनाने काम कराल. नात्यांसाठी हा काळ चांगला आहे, तुमचं आकर्षण वाढेल. लव्ह लाईफमध्ये जवळीक वाढेल आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील.लकी कलर: गुलाबी, लकी नंबर: 4

5/7
कुंभ राशीसाठी हा आठवडा शुभ आणि भाग्याचा असेल. थोडे अडथळे आले तरी तुम्हाला हवं तसं यश आणि नफा मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी सुरुवातीचा काळ खूप चांगला असेल, वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. तुमच्या मेहनतीचं कौतुक होईल आणि कदाचित सन्मान सुद्धा केला जाईल. पण तुमच्या कामात खोडा घालणाऱ्या लोकांपासून सावध राहा. उच्च शिक्षण घेणाऱ्या आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्याच्या शेवटी चांगली बातमी मिळेल.

6/7
कुंभ - व्यवसायाच्या दृष्टीने उत्तरार्ध खूप शुभ असेल. बिझनेससाठी केलेला प्रवास यशस्वी होईल आणि एखादी मोठी डील फायनल होईल. जमीन, घर किंवा वाहन घेण्याचे योग आहेत. जर घरच्यांशी काही पटत नसेल, तर या आठवड्यात एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीने गैरसमज दूर होतील. मनातलं प्रेम व्यक्त करायचं असेल तर हा काळ चांगला आहे. जुनं प्रेम अजून घट्ट होईल. नवरा-बायकोमध्ये आंबट-गोड नोकझोक होईल, पण संसार सुखाचा असेल.लकी कलर: लाल, लकी नंबर: 9

7/7
मीन राशीसाठी हा आठवडा संमिश्र असेल. नोकरी करणाऱ्यांना मध्यम फळं मिळतील, त्यामुळे ऑफिसमध्ये छोट्या गोष्टींचा बाऊ करण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष द्या. सहकाऱ्यांवर आंधळा विश्वास ठेवू नका, स्वतःचं काम स्वतः करणं कधीही चांगलं. या काळात तुमची बदली एखाद्या नको असलेल्या ठिकाणी होऊ शकते किंवा जास्तीची जबाबदारी अंगावर येईल. बिझनेस करणाऱ्यांसाठी आठवड्याचा दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा जास्त चांगला असेल. मार्केटमधल्या तेजीचा तुम्हाला फायदा घेता येईल. जर तुम्ही आधी कुठे गुंतवणूक केली असेल, तर त्याचा फायदा आता मिळेल. रखडलेले प्रोजेक्ट पूर्ण होतील आणि पैशांच्या समस्या सुटतील. उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळतील आणि बचत वाढेल. नात्यांच्या बाबतीत हा आठवडा शुभ असेल, घरगुती चिंता दूर होतील. जोडीदाराशी असलेले संबंध सुधारतील आणि वैवाहिक जीवन सुखी राहील.लकी कलर: आकाशी, लकी नंबर: 2

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement