advertisement

Monthly Horoscope: सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे मासिक राशीभविष्य; मार्च महिना सुख आणि भाग्याचा?

Last Updated:
Monthly Horoscope: यंदाचा फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असून लवकरच मार्च महिना सुरू होत आहे. मार्च बहुतेक राशींसाठी संमिश्र फळ देणारा ठरेल. या महिन्यात यश मिळवण्यासाठी कष्ट, संयम आणि योग्य निर्णयांची जोड द्यावी लागेल. महिन्याची सुरुवात अनेकांसाठी सकारात्मक असेल, करिअरमध्ये नवीन संधी आणि व्यवसायात नफा मिळण्याचे योग आहेत. ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी सांगितलेले सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे मार्च महिन्याचे मासिक राशीभविष्य जाणून घेऊ.
1/8
सिंह - सिंह राशीच्या लोकांनी या महिन्यात पैसा आणि वेळ यांचा खूप विचारपूर्वक वापर करावा. घराची किंवा वाहनाची दुरुस्ती आणि इतर गरजांमुळे खर्च वाढून बजेट बिघडू शकतं. आरोग्याची विशेष काळजी घ्या, जुने आजार त्रास देऊ शकतात. दुसऱ्या आठवड्यात कामासाठी लांबचा प्रवास करावा लागेल. या काळात घरगुती समस्यांमुळे मन थोडे चिंतेत असेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर अनुभवी लोकांचा सल्ला नक्की घ्या.

2/8
सिंह राशीच्या लोकांनी कोणाच्याही सांगण्यावरून गुंतवणूक करू नका, योग्य वेळेची वाट पाहा. व्यवसायात मोठे चढ-उतार पाहायला मिळतील. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागेल. महिन्याच्या मध्यात बोलण्यावर नियंत्रण ठेवा, नाहीतर जवळची माणसं दुखावून तुम्हाला सोडून जातील. वाद टाळा, कारण रागामुळे बनलेली कामं बिघडू शकतात. उत्तरार्धात मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. जोडीदार कठीण काळात तुमची भक्कम साथ देईल.

3/8
कन्या - कन्या राशीसाठी मार्च महिना चांगला जाईल, पण आपल्या महत्त्वाकांक्षांवर ताबा ठेवावा लागेल. महिन्याच्या सुरुवातीला कामाचा ताण असेल आणि तो पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जादा वेळ द्यावा लागेल. करिअर किंवा व्यवसायाबाबत मोठा निर्णय घेताना सावध राहा. तुमचे बेत पूर्ण झाल्याशिवाय कोणाकडेही उघड करू नका, कारण विरोधक टपून बसलेले असतील. दुसऱ्या आठवड्यात अचानक मोठे खर्च समोर येतील, त्यामुळे कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. पोटाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.

4/8
कन्या - महिन्याच्या मध्यात तुमच्या वागण्यामुळे लोक तुमची थट्टा करू शकतात, ज्यामुळे जवळच्या व्यक्ती दुरावतील. पण उत्तरार्ध मात्र तुमच्या बाजूने असेल. ठरलेली कामं वेळेवर पूर्ण होतील आणि व्यवसायात हवा तसा नफा मिळेल. प्रेमसंबंधात घरातील लोकांशी वाद होऊ शकतात किंवा तुमची बदनामी होऊ शकते, त्यामुळे भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. वैवाहिक आयुष्यात गोडवा टिकून राहील.

5/8
तूळ - तूळ राशीसाठी मार्च महिना सुख आणि भाग्याचा असेल. प्रत्येक पावलावर मित्रांची साथ लाभेल आणि नियोजित कामं वेळेत पूर्ण झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. महिन्याच्या सुरुवातीला एखादं मोठं यश मिळेल, ज्यामुळे समाजात प्रतिष्ठा वाढेल. कोर्टाचे निकाल तुमच्या बाजूने लागतील. दुसऱ्या आठवड्यात कामात थोडे अडथळे येतील, पण ते लवकरच दूर होतील. व्यवसायाची गती थोडी मंद असली तरी नफा होत राहील. परदेशी व्यापारात असलेल्या लोकांना महिन्याच्या मध्यात मोठे यश मिळू शकते.

6/8
तूळ राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील आणि बचतीमध्ये वाढ होईल. आर्थिक फायदा होत असतानाच चैनीच्या वस्तूंवरही खर्च होईल. घर, जमीन किंवा वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. राजकारणातील लोकांना हवं ते पद मिळेल. प्रेमसंबंधांसाठी हा महिना खूप शुभ आहे. लग्नाचे बोलणे पुढे सरकेल आणि वैवाहिक सुख मिळेल. आरोग्य उत्तम राहील.

7/8
वृश्चिक - वृश्चिक राशीसाठी मार्च महिना अत्यंत शुभ आणि फायदेशीर ठरेल. रखडलेली कामं पूर्ण होऊन महिन्याची सुरुवात होईल. सरकारी कामात यश मिळेल आणि आर्थिक फायदा होईल. व्यवसायाचा विस्तार करण्याची हीच योग्य वेळ आहे. कुटुंबाचा आणि मित्रांचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठे यश मिळू शकते. दुसऱ्या आठवड्यात थोडे अडथळे आले तरी तुम्ही डगमगणार नाही.

8/8
वृश्चिक - मार्केटिंग क्षेत्रात असलेल्या लोकांसाठी महिन्याचा मध्य खूप फायदेशीर असेल. उत्तरार्धात तुमच्या बुद्धीमुळे तुम्हाला मान-सन्मान आणि पैसा मिळेल. घरात एखादं मंगल कार्य ठरेल आणि आनंदाचे वातावरण असेल. प्रेमसंबंधात जोडीदार तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करेल. एखादं सरप्राईज गिफ्ट मिळण्याची दाट शक्यता आहे. वैवाहिक आयुष्य सुखाचं असेल आणि आरोग्य सुद्धा चांगलं राहील.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement