नवीन मोबाईल नंबर घेताना करू नका 'ही' चुक, शेवटचे 4 अंक महत्वाचे; अन्यथा होईल मोठं आर्थिक नुकसान
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
आजच्या डिजिटल युगात मोबाईल नंबर हा केवळ संपर्काचे साधन राहिला नसून, तो आपल्या बँक खात्याशी, आधार कार्डशी आणि व्यवसायाशी जोडलेला एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अंकशास्त्रानुसार, मोबाईल नंबरमधील अंकांच्या संयोजनाचा आपल्या आर्थिक स्थितीवर आणि प्रगतीवर खोलवर परिणाम होतो.
advertisement
advertisement
94 किंवा 49 या अंकांपासून राहा सावध: अंकशास्त्रानुसार, मोबाईल नंबरमध्ये '9' आणि '4' यांचे एकत्र येणे संघर्ष वाढवणारे मानले जाते. जर तुमच्या नंबरची सुरुवात 94 ने होत असेल किंवा नंबरमध्ये 49 ही जोडी वारंवार येत असेल, तर अचानक मोठे आर्थिक नुकसान होण्याचे योग येतात. हा आकडा विनाकारण खर्च वाढवतो आणि कामात वारंवार अडथळे निर्माण करतो.
advertisement
advertisement
'0' चा अतिवापर टाळा: मोबाईल नंबरच्या शेवटी वारंवार शून्य येणे शुभ मानले जात नाही. शून्य हा पोकळीचे प्रतीक आहे. जर तुमच्या नंबरच्या शेवटी दोन किंवा तीन शून्य असतील, तर तुमचे कष्ट जास्त आणि फळ कमी, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. विशेषतः गुंतवणुकीच्या क्षेत्रात असलेल्या लोकांनी शून्य असलेला नंबर टाळावा.
advertisement
मूलांक आणि नंबरची बेरीज: तुमचा मोबाईल नंबर तुमच्या जन्मतारखेच्या मूलांकाशी सुसंगत असावा. तुमच्या मोबाईल नंबरच्या सर्व 10 अंकांची बेरीज करा. ती बेरीज जर 2, 4 किंवा 8 येत असेल, तर अशा नंबरमुळे आयुष्यात संघर्ष वाढू शकतो. ही बेरीज 1, 3, 5 किंवा 6 येणे प्रगतीसाठी आणि संपत्तीसाठी अत्यंत लाभदायक मानले जाते.
advertisement
नंबरमधील 'जोडी' ठरवते नफा-तोटा: मोबाईल नंबरमध्ये अंकांच्या जोड्या महत्त्वाच्या असतात. उदाहरणार्थ, नंबरमध्ये '15', '51', '48' किंवा '84' या जोड्या असल्यास कायदेशीर कचाटा किंवा आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. याउलट '59', '95' किंवा '13' सारख्या जोड्या प्रगतीसाठी सहाय्यक ठरतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)






