advertisement

Astrology: सुखी संसाराला कोणाची तरी दृष्ट; घातक कालसर्प योगाची छाया चार राशींवर पडणार, घरात वादळ

Last Updated:
kaalsarp yog Bad effect on Rashi: ज्योतिषशास्त्रातील काही घातक योगांपैकी एक असलेला कालसर्प योग अनेकांच्या नाकात दम आणतो. सुरळीत चाललेली कामं या योगाचा प्रभाव पडल्यानं बिघडू लागतात. असंख्य अडचणी मागे लागतात, जीवन नकोस होतं. दिनांक 18 मे 2025 रोजी राहु-केतूने राशी पालट केल्याने आता लवकरच त्याचे दुष्परिणाम काही राशींना दिसू लागतील. राहु कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत आल्याचे विपरित परिणाम 28 जुलै 2025 पर्यंत दिसून येणार आहेत.
1/6
ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार,राहु-केतूच्या सद्य स्थितीमुळ कालसर्प दोष प्रभावी होणार आहे. सर्व ग्रह राहू आणि केतुच्या अक्षाच्या एकाच बाजूला येतात, तेव्हा कुंडलीत कालसर्प योग तयार होतो, असे मानले जाते. प्राचीन ग्रंथांमध्ये याचा स्पष्ट उल्लेख नसला तरी हा एक अशुभ योग मानला जातो. पूर्वी याला नागदोष किंवा पितृदोष म्हणून ओळखले जात असे, परंतु अलिकडे ज्योतिषशास्त्रात याला जीवनात मानसिक ताण, अडचणी आणणारा योग असे मानले जाते.

2/6
कालसर्प योगाचा या काळात चार राशींवर विशेष परिणाम होणारा आहे. त्यामुळे त्या राशीच्या लोकांना मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो. त्या राशींबद्दल जाणून घेऊया.

3/6
मेष - मेष राशीचे लोकांची आधीच साडेसाती आणि केतूच्या पंचम भावामुळेमोठी पंचाईत झाली आहे. कामांना यश येत नाही, कामावर अडचणी येत राहतात. त्यातच कालसर्प योगाचा प्रभाव वाढल्याने या राशीच्या लोकांना अनेक त्रासांचा सामना करावा लागेल. दवाखान्याच्या चकरा माराव्या लागू शकतात.

4/6
सिंह राशीच्या लोकांना आता शौर्य दाखवता येणार नाही, कालसर्प योगात त्यांचे सगळे प्रयत्न कुचकामी ठरतील, कोणी मदतीला येणार नाही, निराश वाटेल. नोकरी जाण्याची भीती डोक्यात चिंतेचा विषय असेल. वीज आणि धारधार गोष्टींपासून स्वत:ला जरा अन्यथा अपघात होऊ शकतो.

5/6
कुंभ - साडेसातीचा शेवटचा टप्पा कसाबसा निभावून नेत असतानाच आता कालसर्प योगात संकटे परत तोंड वर काढू शकतात, मानसिक गोंधळ उडेल, आरोग्य समस्या चिंतेचे कारण असतील. या काळात योग्य आहार घ्यावा लागेल. पैसा टिकवून ठेवणं शक्य होणार नाही, खर्च वाढतील.

6/6
मीन - या राशीवर साडेसातीचा दुसरा टप्पा चालू असल्यानं संकटे एका मागून एक येत आहेत. त्यातच कालसर्प योग मीन राशींच्या अडचणी आणखी वाढवेल. धनहानी टाळण्यासाठी हुशारीने निर्णय घ्या. वाद वाढणार नाहीत याची काळजी घ्या, जुना आजार पुन्हा त्रास देऊ शकतो, वाहन चालवताना विशेष खबरदारी घ्यावी लागेल. कौटुंबिक जीवनात वादळ येऊ शकते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement