Astrology: पैशाचं नुकसान, आजारपण, अपघात! या राशींची खराब वेळ सुरू झालीय; सावधान चुकीला नो माफी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology: ज्योतिषशास्त्राची माहिती घेत असलेल्या अनेकांना माहीतच असेल 29 मार्च रोजी शनि गोचर झाले. अडीच वर्षांनी झालेले शनीचे भ्रमण अधिक खास आहे. सूर्यग्रहण असताना त्याच दिवशी शनिने रास बदलली. 29 मार्च रोजी सूर्यग्रहण आणि शनीच्या गोचराचा योगायोग अत्यंत दुर्मिळ होता, कारण ज्योतिषशास्त्रात शनि आणि सूर्य हे कट्टर शत्रू मानले जातात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अडीच वर्षे सावधगिरी बाळगा. साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात, पैशांची गुंतवणूक हुशारीने करा. या काळात जर कुंडलीत अशुभ ग्रहांची दशा किंवा अंतरदशा चालू असेल, तर व्यक्ती मोठी स्वप्ने पाहू लागते आणि स्वप्नांच्या जगात हरवून जाते, त्यांना प्रत्यक्ष जगाचे भान राहत नाही. वास्तवाच्या आधारावर काम करणे गरजेचे आहे.
advertisement
शनीच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी हनुमान चालीसा वाचा. हनुमानाची पूजा केल्याने शनीच्या प्रभावापासून संरक्षण होते. शनिवारी, पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलात काळे तीळ मिसळून दिवा लावा. गरिबांना मदत करा. कोणतेही चुकीचे काम करू नका, अन्यथा शनि तुम्हाला कठोर शिक्षा करेल. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन सहामुखी रुद्राक्ष घालू शकता.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)