360 डिग्रीवर चंद्र-सूर्य आमनेसामने! 'हा' डेंजरस योग 4 राशींसाठी ठरणार भारी, एकदा वाचाच काय घडणार?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, व्यतिपात योग हा अत्यंत संवेदनशील आणि आव्हानात्मक योग मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा सूर्य आणि चंद्र 360 अंशांवर असतात आणि समोरासमोर येतात, तेव्हा हा योग तयार होतो.
advertisement
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या हालचाली आणि नक्षत्रांचे संयोग मानवी जीवनावर शुभ-अशुभ परिणाम करत असतात. सूर्य आणि चंद्राच्या विशिष्ट स्थितीमुळे 25 एप्रिल 2026 रोजी 'व्यतिपात योग' निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रात व्यतिपात योग हा अत्यंत प्रतिकूल आणि अशुभ मानला जातो.हा योग विशेषतः 4 राशींच्या जातकांसाठी आव्हानात्मक ठरणार असून, त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
advertisement
वृषभ - गुंतवणुकीत मोठे नुकसान: वृषभ राशीच्या जातकांसाठी व्यतिपात योग धनहानीचे संकेत देत आहे. आजच्या दिवशी शेअर बाजार किंवा कोणत्याही नवीन व्यवसायात मोठी गुंतवणूक करणे टाळावे. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेतल्याशिवाय घेतलेला आर्थिक निर्णय तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतो. रिअल इस्टेटच्या व्यवहारात फसवणूक होण्याची शक्यता असल्याने कागदपत्रे नीट तपासावीत.
advertisement
कन्या - अनपेक्षित खर्च आणि व्यावसायिक तणाव: कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ व्यावसायिक आयुष्यात थोडा तणावपूर्ण ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचे कोणाशी तरी विनाकारण वाद होण्याची शक्यता आहे. आज अचानक मोठा खर्च समोर येईल, ज्यामुळे तुमची जमापुंजी किंवा बचत खर्च होऊ शकते. आर्थिक नियोजनाचा अभाव तुम्हाला मानसिक तणावात टाकू शकतो.
advertisement
मकर - अडकलेले पैसे आणि प्रगतीत अडथळे: मकर राशीच्या लोकांसाठी कामात अडथळे येण्याचे योग आहेत. जर तुमचे पैसे कोणाकडे अडकले असतील, तर ते मिळण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल. आज कोणालाही उसने पैसे देऊ नका, कारण ते परत मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. नोकरीमध्ये तुमच्या कामाचे श्रेय दुसरे कोणीतरी घेण्याची शक्यता आहे, त्यामुळे सतर्क राहा.
advertisement
मीन - निर्णयक्षमतेचा अभाव आणि फसवणूक: मीन राशीत ग्रहांची स्थिती गोंधळ निर्माण करणारी असेल. व्यतिपात योगाच्या प्रभावामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेणे कठीण जाईल. जवळच्या व्यक्तीकडूनच आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असल्याने कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. नातेसंबंधांमधील तणावाचा परिणाम तुमच्या कामावर होऊ शकतो, त्यामुळे डोकं शांत ठेवा.





