Astrology: फक्त काही तास! मंगळाचा महाभाग्य योग जुळल्यानं 3 राशींना सगळं अलबेल; चिंतेचे प्रश्न मिटणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mahabhagya Rajyog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, भूमीपुत्र मंगळ सध्या कन्या राशीत असून तो सतत कोणत्या ना कोणत्या राशीशी दृष्टी-संबंध निर्माण करत आहे. त्याचप्रमाणे, मंगळ लवकरच मनाचा कारक चंद्राशी युती करणार आहे. चंद्राची मंगळाशी युती झाल्यामुळे महाभाग्य योग निर्माण होत आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे त्याचा परिणाम 12 राशींच्या जीवनात विविध प्रकारे दिसून येईल. राशीचक्रातील 3 राशींना याचा सर्वाधिक फायदा मिळू शकतो.
वैदिक पंचांगानुसार, 25 ऑगस्ट रोजी सकाळी 8:28 वाजता चंद्र कन्या राशीत प्रवेश करेल. तिथे मंगळ आधीच उपस्थित आहे. अशा परिस्थितीत चंद्र आणि मंगळाच्या युतीमुळे महालक्ष्मी राजयोग तयार होत आहे. हा योग 27 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 07:21 पर्यंत राहणार आहे. या योगाला महाभाग्य योग किंवा चंद्र-मंगळ योग असंही म्हणतात.
advertisement
advertisement
मेष - या राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी युती खूप फायदेशीर ठरू शकते. महाभाग्य योगाच्या निर्मितीमुळे या राशीच्या लोकांमध्ये सकारात्मक येईल. यासोबतच कामात आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या भावना योग्यरित्या व्यक्त करू शकाल. तुमचा तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. एखादी छानशी ट्रीप होऊ शकते. तुम्ही संयमाने काम केले तर नाते संबंध चांगले होतील. करिअरच्या बाबतीतही तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. तुम्हाला काही नवीन संधी मिळू शकतात.
advertisement
वृषभ - चंद्र आणि मंगळाच्या युतीमुळे निर्माण झालेला महाभाग्य योग वृषभ राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रात फायदा देऊ शकतो. कामाच्या क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर प्रगतीची नवीन दारे उघडतील. विशेषतः आयटी, डेटा सायन्स, तंत्रज्ञान आणि संशोधनाशी संबंधित लोकांना खूप फायदा होऊ शकतो. तुमच्या कामाचे, मेहनतीचे कौतुक होऊ शकते. कामाच्या ठिकाणी प्रगतीसोबतच तुम्हाला आदरही मिळू शकतो. तथापि, या काळात काही आव्हाने देखील येऊ शकतात, म्हणजे सहकाऱ्यांशी मतभेद किंवा कामाच्या ठिकाणी वैचारिक संघर्ष होईल. पण, शांत आणि संतुलित राहून समस्या सोडवल्या तर तुम्हाला फायदे मिळू शकतात.
advertisement
धनु - महाभाग्य योग या राशीच्या लोकांसाठी अनेक क्षेत्रांमध्ये फायदे आणू शकतो. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो. या काळात तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल आणि तुमच्या भावना आणि इच्छा उघडपणे व्यक्त करू शकाल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत, धनु राशीचे लोक खूप उत्साही दिसतील. उत्साह वाढेल. तथापि, कोणत्याही कामात किंवा निर्णयात घाई करू नका. यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. तुम्ही संयम आणि संतुलन राखण्यात यशस्वी व्हाल. नोकरीत तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)