daily horoscope: आता दु:खाचे दिवस संपणार, या राशींना होईल आर्थिक लाभ, मिळेल मोठी बातमी!
- Published by:Prachi Dhole
- trending desk
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Rashi Bhavishya In Marathi: कसा असेल आजचा दिवस, कोणाला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी. पहा आजचं दैनिक राशीभविष्य
मेष (Aries) : श्री गणेश सांगतात, घरी पाहुणे येतील. लांबच्या व्यक्तीकडून एखादी चांगली बातमी समजू शकते. व्यवसाय चांगला चालेल. नोकरीत समाधानकारक स्थिती असेल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आत्मविश्वास वाढेल. पण विरोध होईल. वादविवाद त्रासदायक ठरतील. जुना आजार पुन्हा उद्भवू शकतो. कौटुंबिक चिंता सतावेल.Lucky Color : Red
Lucky Number : 2
advertisement
वृषभ (Taurus) : श्री गणेश सांगतात, विरोधक सक्रिय असतील. शारीरिक त्रास होऊ शकतो. दुसऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करू नका. व्यवसायासाठी केलेला प्रवास यशस्वी होईल. अनपेक्षित लाभ मिळू शकतो. व्यवसायात फायदा होईल. गुंतवणुकीतून अपेक्षित लाभ मिळेल. परीक्षा किंवा मुलाखतीत यश मिळू शकते. नशिबाची साथ मिळेल. आनंद वाटेल.Lucky Color : Yellow
Lucky Number : 4
advertisement
मिथुन (Gemini) : श्री गणेश सांगतात, अनपेक्षित खर्च होईल. संवाद साधताना चुकीचे शब्द वापरू नका अन्यथा वाद वाढू शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याची चिंता राहील. तणाव असेल. जुना आजार पुन्हा उद्भवू शकतो. व्यवहारात सावधगिरी बाळगा. कोणाच्या बोलण्याने प्रभावित होऊ नका. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.Lucky Color : Green
Lucky Number : 17
advertisement
कर्क (Cancer) : श्री गणेश सांगतात, धनहानी होऊ शकते. त्यामुळे काळजी घ्या. एखाद्या व्यक्तीच्या वर्तनामुळे तुमचा स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी असेल. वाद टाळा. विरोधक शांत असतील. थकबाकी वसूल करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. प्रवास लाभदायक ठरेल. व्यवसाय अपेक्षेनुसार चालेल. नोकरीच्या ठिकाणी शांतता असेल.Lucky Color : Sky Blue
Lucky Number : 11
advertisement
सिंह (Leo) : श्री गणेश सांगतात, त्रास, तणाव आणि चिंतेचे वातावरण असेल. विरोधक पराभूत होतील. पैसे सहज मिळतील. नवीन योजना आखाल, पण फायदा लगेच मिळणार नाही. कामकाजात सुधारणा होईल. सामाजिक कार्य करावेसं वाटेल. मानसन्मान मिळेल. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडातून अपेक्षित फायदा होईल.
Lucky Color : Brown
Lucky Number : 16
advertisement
कन्या (Virgo) : श्री गणेश सांगतात, सध्या अनेक नवीन गोष्टी तुमच्या समोर येत आहेत. तुमच्या मार्गातील अडथळ्यांचा सामना करण्यासाठी तयार राहा. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे प्रगतीचा पाया मजबूत तयार होईल. स्वतःला फ्रेश आणि आनंदी ठेवा. तुम्हाला आज आळस जाणवेल. पण तो स्वाभाविक असेल. कारण गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही वेगानं काम करत आहात.Lucky Color : Pink
Lucky Number : 6
advertisement
तूळ (Libra) : श्री गणेश सांगतात, अध्यात्मात रुची वाढेल. तुम्हाला एखाद्या सत्पुरुषाचा आशीर्वाद मिळेल. न्यायालयीन कामं तुमच्या इच्छेनुसार कराल. नोकरदार व्यक्तींचा ऑफिसमध्ये प्रभाव वाढेल. व्यवसायात फायदा होईल. सहकारी, कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. निष्काळजी राहू नका.Lucky Color : Dark Green
Lucky Number : 7
advertisement
वृश्चिक (Scorpio) : श्री गणेश सांगतात, एखादा जुना आजार उद्भवू शकतो. दूरच्या व्यक्तीकडून एखादी निराशाजनक बातमी समजू शकते. विनाकारण धावपळ होईल. एखाद्याच्या वागण्यानं नाराज व्हाल. अपेक्षित कामात विलंब होईल. जास्त प्रयत्न करावे लागतील. एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या नाराजीला सामोरं जावं लागेल. व्यवसाय चांगला चालेल.Lucky Color : Blue
Lucky Number : 3
advertisement
धनू (Sagittarius) : श्री गणेश सांगतात, कायदेशीर अडथळे दूर होतील. लाभदायक स्थिती तयार होईल. थकवा आणि अशक्तपणा जाणवेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं सहकार्य मिळेल. व्यवसायात फायदा होईल. गुंतवणुकीत घाई करू नका. नोकरीत शांतता असेल. पैसे सहज मिळतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. कामे वेळेवर पूर्ण होतील.Lucky Color : Black
Lucky Number : 11
advertisement
मकर (Capricorn) : श्री गणेश सांगतात, कोणत्याही गोष्टीत घाई गडबड करू नका. काही समस्या उद्भवू शकतात. शरीर रिलॅक्स होईल. व्यवहारात घाई नको. जमीन, घराच्या खरेदी-विक्रीची योजना आखाल. नोकरदार व्यक्तींचा ऑफिसमध्ये प्रभाव वाढेल. उत्पन्न वाढेल. नोकरीसाठी केलेल्या प्रयत्नात यश मिळेल. बेफिकीर राहू नका.Lucky Color : Navy Blue
Lucky Number : 9
advertisement
कुंभ (Aquarius) : श्री गणेश सांगतात, प्रवास मनोरंजक असेल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यस्ततेमुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पैसे सहज मिळू शकतील. मित्र वेळेवर सहकार्य करतील. रखडलेल्या कामांना गती मिळेल. आनंदी असाल. जोखीम टाळा.Lucky Color : Orange
Lucky Number : 18
advertisement
मीन (Pisces) : श्री गणेश सांगतात, व्यवसायासाठी केलेला प्रवास यशस्वी होईल. अस्वस्थता जाणवेल. प्रयत्न यशस्वी होतील. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. सामाजिक कार्यात रूची असेल. मान सन्मान मिळेल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. धोका पत्करू नका. भागीदारांचे सहकार्य मिळेल. कामे पूर्ण होतील. घरात आणि बाहेर आनंद मिळेल.Lucky Color : White
Lucky Number : 12