Maruti चा धमाका,लाँचच्या आधीच SUV निघाली टँकसारखी दणकट, मिळाले 5 स्टार सेफ्टी रेटिंग
- Published by:Sachin S
Last Updated:
मारुती सुझुकीची ही तिसरी कार ठरली असून जी सेफ्टीमध्ये टँकसारखी निघाली आहे. भारत NCAP क्रॅश टेस्टमध्ये Maruti Suzuki E Vitara ला 5 स्टार रेटिंग मिळाले आहे
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकी आता ईलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये पाऊल टाकणार आहे. मारुती सुझुकी आपली पहिली वहिली ईलेक्ट्रिक एसयूव्ही म्हणून Maruti Suzuki E Vitara लाँच करणार आहे. पण, लाँच करण्याच्या आधीच Maruti Suzuki E Vitara ने सेफ्टीच्या बाबतीत ५ स्टार रेटिंग मिळवले आहे.
advertisement
advertisement
भारत NCAP क्रॅश टेस्टमध्ये Maruti Suzuki E Vitara ला सर्वाधिक 32 पैकी 31.49 गूण मिळाले आहे. ज्यामुळे ती सहज 5 स्टार रेटिंग एसयूव्ही असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. Maruti Suzuki E Vitara मध्ये दोन्ही पुरुषांचे डमी ठेवले होते, त्यांच्या छाती, पाय आणि गुडघ्याला पूर्णपणे सुरक्षा मिळाली. तर फ्रंटल ऑफसेट डिफॉर्मेबल टेस्टमध्ये 16 मधून 15.49 गूण मिळाले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


