Nissan Gravite दमदार इंजिनसह भारतात झाली लॉन्च! मिळतात अड्हान्स फीचर्स, किंमत किती?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Nissan Gravite भारतात बजेट एमपीव्ही म्हणून लॉन्च करण्यात आली आहे. यामध्ये 1 लिटर इंजिन आणि 6 एयरबॅग्ससारखे फीचर्स आहेत.चला या कारचे इंजिन, फीचर्स, किंमत आणि कोणत्या कारला टक्कर देील याचे डिटेल्स जाणून घेऊया.
advertisement
advertisement
Nissan Gravite सह 3 वर्षे किंवा 1,00,000 किमी ची स्टँडर्ड वॉरंटी दिली जात आहे. ती वाढवून 10 वर्षे किंवा 5,00,000 किमीपर्यंत केली जाऊ शकते. जी या सेगमेंटमध्ये अट्रॅक्टिव्ह ऑप्शन आहे. पहिल्या 5,000 बुकिंग्सवर 5 वर्षांपर्यंत झिरो सर्व्हिस कॉस्टचा लाभ मिळेल. सोबतच फायनेन्स आणि अपग्रेड बेनिफिट्सही दिले जात आहेत.
advertisement
एक्सटीरियर आणि डिझाइन : ग्रेव्हाइटची रचना ट्रायबरसारखीच आहे, परंतु त्यात विशिष्ट DRL सिग्नेचरसह हेडलॅम्प, पुन्हा डिझाइन केलेले बंपर आणि C-आकाराचे सिल्व्हर इन्सर्ट आहेत. बोनेट आणि टेलगेटवरील ग्रेव्हिट लेटरिंग ते वेगळे बनवते. हनीकॉम्ब-पॅटर्न ग्रिल आणि नवीन व्हील डिझाइन्स त्याचे स्वरूप आणखी वाढवतात. ही MPV फॉरेस्ट ग्रीन, ओनिक्स ब्लॅक, ब्लेड सिल्व्हर, स्नो व्हाइट आणि मेटॅलिक ग्रे सारख्या रंगांमध्ये उपलब्ध आहे.
advertisement
advertisement
याव्यतिरिक्त, पुश-बटण स्टार्ट, क्रूझ कंट्रोल, ऑटो एलईडी हेडलॅम्प, रेन-सेन्सिंग वायपर्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रिअर एसी व्हेंट्स आणि वायरलेस चार्जर या फीचर्सचा समावेश आहे. सेफ्टी फीचर्समध्ये सहा एअरबॅग्ज, पार्किंग सेन्सर्स, रिव्हर्स कॅमेरा आणि टीपीएमएससह 45 हून अधिक सेफ्टी फीचर्स समाविष्ट आहेत. लाँच एडिशन, जे फक्त 1001 युनिट्सपर्यंत मर्यादित असेल, त्यात जेबीएल साउंड सिस्टम, ड्युअल-चॅनेल डॅशकॅम आणि अॅम्बियंट लाइटिंग आहे.
advertisement
इंजिन, गियरबॉक्स आणि मायलेज : Nissan Gravite मध्ये 1.0 लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहेत. जे 72hp ची पॉवर आणि 96Nm टॉर्क देते. यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गियरबॉक्सचा ऑप्शन मिळतो. कंपनीनुसार मॅन्युअल व्हेरिएंट 19.3 किमी/लीटर आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंट 19.6 किमी/लीटरचा मायलेज देते. लवकरच यामध्ये डीलर-फिट ड्यूल-सिलेंडर सीएनजी किटही उपलब्ध असेल. जी फक्त मॅन्युअल व्हर्जनमध्ये मिळेल.









