Toyota ची टँकसारखी 'मिनी फॉर्च्युनर' डंपरला धडकली, इंजन फुटलं, आग लागली; पण सगळे वाचले, पुण्यातले PHOTOS

Last Updated:
सेफ्टी रेटिंग महत्त्वाची का असते याचं उदाहरण पुण्यातील एका अपघातात समोर आलं आहे. पुण्यात Toyota Urban Cruiser Hyryder या एसयूव्हीचा अपघात झाला पण सुदैवाने सगळे प्रवासी वाचले. (अभिजित पोते, प्रतिनिधी)
1/7
सध्या कार खरेदी करत असताना सेफ्टीबद्दल तिला किती रेटिंग आहे हे पाहिलं जात आहे. कारण, अपघातात कारमध्ये प्रवाशांची जीव कसा वाचू शकते हे सेफ्टी रेटिंगवर ठरलेलं असतं. सेफ्टी रेटिंग महत्त्वाची का असते याचं उदाहरण पुण्यातील एका अपघातात समोर आलं आहे.  Toyota कंपनीच्या गाड्या या नेहमी सेफ कार मानल्या जात्यात. पुण्यात Toyota Urban Cruiser Hyryder या एसयूव्हीचा अपघात झाला. या अपघातात कारचं इंजिन चेंदामेंदा झालं, आग लागली. पण कारमध्ये बसलेले सगळे प्रवासी सुखरूप बचावले आहे.

advertisement
2/7
 मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील  भुकूम इथं पुणे-कोलाड रस्त्यावर घटना घडली आहे. Toyota Urban Cruiser Hyryder ने  डंपरला जोराची धडक दिली. या अपघातात Toyota Urban Cruiser Hyryder चा चालक हा जखमी झाला आहे. मात्र वेळीत एअर बॅग ओपन झाल्यामुळे कारमधील सगळे प्रवासी वाचले आहे.

3/7
 शुक्रवारी सकाळी सुमारे अकरा वाजता ही घटना घडली.  चार ते पाच मित्र हे Toyota Urban Cruiser Hyryder ने ( एमएच१२ एक्सएएक्स २०५८) पिरंगुटकडे चालले होते.

4/7
 भुकूम इथं पुणे-कोलाड इथं पोहोचले असता कृषि विभागाच्या बीजगुणन क्षेत्रासमोर पिरंगुटहून पुण्याच्या दिशेनं एक डंपर चालला होता. या डंपरला  Toyota Urban Cruiser Hyryder गाडी जोरात धडकली.  हा अपघात इतका भीषण होता की, एसयूव्हीचा समोरील भागाचा चक्काचूर झाला.

5/7
 धडक लागल्यामुळे Toyota Urban Cruiser Hyryder  चं इंजिन पूर्णपणे फुटलं आणि आग लागली. पण वेळीच प्रवाशांनी कारमधून बाहेर उड्या टाकल्या.   सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसून कारचालकाच्या छातीला मार लागला आहे.

6/7
 मात्र, या अपघातात  कारचालक कार्तिक जयेश हाडके (वय २१ , रा. लोणी काळभोर ) याच्या छातीला मार लागून ते जखमी झाले आहे. 
 त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
मात्र, या अपघातात कारचालक कार्तिक जयेश हाडके (वय २१ , रा. लोणी काळभोर ) याच्या छातीला मार लागून ते जखमी झाले आहे. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
advertisement
7/7
Toyota Urban Cruiser Hyryder ही  एक दमदार आणि मजबूत अशी एसयूव्ही आहे. ज्यावेळी कारचा डंपरला धडकली तेव्हा कारमधील एअरबॅग उघडले होते. त्यामुळे प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. Toyota  Urban Cruiser Hyryder ला सेफ्टीमघ्ये ४ स्टार मिळाले आहे. ही एक मिडसाईट एसयूव्ही आहे. फॉर्च्यूनरची कॉपी म्हणून मार्केटमध्ये या एसयूव्हीची ओळख आहे. या एसयूव्हीची किंमत १० लाखांपासून सुरू होते.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement