मत्स्य व्यवसायाच्या शिक्षणानंतर नोकरीच्या भरपूर संधी? संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर..
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
- Published by:News18 Marathi
Last Updated:
वेगळ्या अशा मत्स्यव्यवसायाच्या क्षेत्रात देखील स्वयंरोजगार आणि परदेशातील नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. जर विद्यार्थ्यांनी ठरवले तर या क्षेत्रात चांगले करिअर घडवू शकतात.
सध्याच्या काळात नोकरी किंवा रोजगार मिळवणे हे अवघड बनले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील शिक्षण घेऊन आपल्या उदरनिर्वाहासाठी बरेचसे विद्यार्थी प्रयत्न करताना दिसत आहेत. तर वेगळ्या अशा मत्स्यव्यवसायाच्या क्षेत्रात देखील स्वयंरोजगार आणि परदेशातील नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. जर विद्यार्थ्यांनी ठरवले तर या क्षेत्रात चांगले करिअर घडवू शकतात. याबाबतची माहिती कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील मत्स्य व्यवसाय विषयाच्या प्राध्यापकांनी माहिती दिली आहे.
advertisement
शिवाजी विद्यापीठात प्राणीशास्त्र विभागात मत्स्य व्यवसाय संदर्भात शिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमात चार सेमिस्टरमध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे. यामध्ये गोड्या पाण्यातील, खाऱ्या पाण्यातील, निम खाऱ्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाबाबत शिकवले जाते. त्याचबरोबरीने माशांना देखील विविध प्रकारचे रोग होत असतात. त्यांच्यावर औषधोपचार कशा करायचा, हे देखील या अभ्यासक्रमात शिकवले जाते. तसेच या मत्स्य व्यवसायातील विपणन धोरण देखील विद्यार्थ्यांना यातून अभ्यासता येते, अशी माहिती प्रा. डॉ. एम. पी. भिलावे यांनी दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement







