Crime: नवऱ्याला कापलं, मुंडकं तोडून ड्रमामध्ये टाकलं अन् सिमेंटने भरला!
- Published by:sachin Salve
- local18
Last Updated:
हे तुकडे एका ड्रममध्ये टाकण्यात आले आणि सिमेंट आणि वाळूने पूर्णपणे सील करण्यात आले, जेणेकरून मृतदेह सडला तरी वास पसरणार नाही आणि कोणालाही संशय येणार नाही.
नवरा बायकोची भांडणं ही कोणत्या घरात होत नाही. भांड्याला भांड लागतचं असतं. पण नवरा बायकोच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नुकतीच समोर आली आहे. एखाद्या सिनेमाला लाजवेल अशी ही घटना आहे. प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली. नुसती हत्या करून दोघे थांबले नाही. तर घरात एका ड्राममध्ये त्याचा मृतदेह टाकला आणि सिमेंट टाकून तो बंद केला. हा प्रकार पाहून केवळ पोलिसांनाच नाही तर शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ड्रम, चाकू, सिमेंट आणि वाळूचा वापर अशा प्रकारे करण्यात आला की ते पाहून सगळेच हादरले.
advertisement
सौरभ राजपूत असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. सौरभ हा मर्चंट नेव्हीमध्ये होता. तर त्याची बायको मुस्कान रस्तोगी ही साहिल नावाच्या विकृत तरुणाच्या प्रेमात पडली होती. आपल्या प्रेमसंबंधात अडतळा येत असल्यामुळे दोघांनी मिळून सौरभचा खून केला. खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची यासाठी दोघांनी जो प्रकार केला ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.
advertisement
advertisement
advertisement
मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला या दोघांनी ४ मार्च रोजी सौरभची चाकूने वार करून हत्या केली. पण हत्येनंतर त्याने जे केले ते एखाद्या सिनेमाला लाजवेल असंच होतं. सगळ्या आधी त्यांनी त्याच्या छातीवर चाकूने हल्ला केला, नंतर त्याला बाथरूममध्ये नेलं आणि त्याच्या शरीराचे विविध भाग - डोकं, धड आणि बोटं कापली.
advertisement
advertisement
पोस्टमार्ट कर्मचारी बलवीर यांनी ड्रम फोडण्यासाठी खूप कष्ट केलं. त्यांनी पुढे सांगितले की, ड्रमच्या वरच्या भागात सिमेंटचा ६ इंच जाडीचा थर होता. तो तोडण्यासाठी ५ मजुरांना २ ते अडीच तास मेहनत करावी लागली. हातोडा, कटर आणि ग्राइंडर वापरलं तेव्हा ड्रम आम्हाला फोडता आला. मृतदेह सिमेंटने बांधला होता, जो काढण्यासाठी अनेक तास लागले. जेव्हा ड्रम आम्ही तोडला तेव्हा ते दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वजण हादरले,
advertisement
पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टरही सुन्न झाले होते. मेरठचे सीएमओ डॉ. अशोक कटारिया म्हणाले की, पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार सौरभची हत्या दोन आठवड्यांपूर्वी झाली होती. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी, मारेकऱ्यांनी तो सिमेंटने झाकला, ज्यामुळे मृतदेह कुजला. शरीराचे अनेक तुकडे झाले होते, दात सैल होते आणि त्वचा पूर्णपणे सैल होती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement