Pranit More: 'कोणताही पश्चात्ताप नाही', प्रणित मोरे आणि मालती चहरच्या नात्यात अजूनही तणाव? कॉमेडियनने अखेर मौन सोडलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Pranit More-Malti Chahar: फायनल संपल्यानंतर एका मुलाखतीत प्रणितने मालतीसोबतच्या नात्यावर मौन सोडले असून त्याने मालतीबद्दल काही वक्तव्ये केली आहेत.
मुंबई: 'बिग बॉस १९' चा प्रवास नुकताच संपला असला तरी, घरातील स्पर्धकांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा अजूनही थांबलेली नाही. शोचा दुसरा रनर-अप ठरलेल्या महाराष्ट्राचा लाडका कॉमेडियन प्रणित मोरे आणि वाईल्ड कार्ड स्पर्धक मालती चहर यांच्यातील लव्ह-हेट रिलेशनशिपबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. फायनल संपल्यानंतर एका मुलाखतीत प्रणितने या नात्यावर मौन सोडले असून त्याने मालतीबद्दल काही वक्तव्ये केली आहेत.
advertisement
मालतीसोबतच्या लव्ह-हेट रिलेशनशिपबद्दल विचारले असता, प्रणितने मान्य केले की घरात फार कमी लोक त्याचे खरे मित्र होते आणि त्यात मालतीचा समावेश होता. प्रणित म्हणाला, "घरात मी ज्यांना मोजकेच मित्र मानले, त्यापैकी एक मालती होती. पण दुर्दैवाने, ती घराबाहेर पडण्याच्या नेमक्या त्याच दिवशी आमचे भांडण झाले."
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मात्र, तो पुढे म्हणाला, "राग आणि रागाच्या भरात एखादी गोष्ट मी बोललो असेन, जी नाही बोलायला हवी होती. पण त्या क्षणाला त्याची जाणीव होत नाही. मी चूक स्वीकारतो आणि माफीही मागितली आहे." दरम्यान, 'बिग बॉस १९' चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला, ज्यात गौरव खन्ना विजेता ठरला, तर प्रणित मोरेला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.


