'बेडवर मी लोण्यासारखी...'; टॉप भारतीय क्रिकेटरसोबत बॉबी डार्लिंगचा 'वन नाईट स्टँड', म्हणाली...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bobby Darling : अभिनेत्री बॉबी डार्लिंगने लोकप्रिय क्रिकेटरसोबत 'वन नाईट स्टँड' केल्याचा दावा केला आहे. या खुलाशामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
मुंबई: बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावरची एक बोल्ड आणि बेधडक व्यक्तिमत्व म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री बॉबी डार्लिंग पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एकेकाळी अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजन शोमधून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आपल्या अभिनयासाठी आणि हटके शैलीसाठी प्रसिद्ध असलेली बॉबी, यावेळी एका धक्कादायक खुलाशामुळे चर्चेत आहे.
advertisement
advertisement
'बॉलिवूड ठिकाणा'ला दिलेल्या एका मुलाखतीत बॉबी डार्लिंगने थेट दावा केला की, तिचा भारताचा माजी वेगवान गोलंदाज मुनाफ पटेल याच्यासोबत एकदा 'वन नाईट स्टँड' झालं होतं. या खुलाशानंतर बॉबीची मुलाखत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे आणि लोक त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. बॉबीने मुलाखतीत सांगितलं की, त्यावेळी ती आणि मुनाफ चांगले मित्र होते. त्यांची भेट एका क्लबमध्ये झाली होती, जिथे त्यांनी एकत्र पार्टी केली आणि क्लबिंगचा आनंद घेतला.
advertisement
advertisement
बॉबीने हे देखील मान्य केलं की, त्या काळात तिची प्रतिमा थोडी फ्लर्टीशियस आणि आकर्षित करणारी होती. ती पुढे म्हणाली, "मी हे म्हणणार नाही की ते एक 'रिलेशनशिप' होतं. पण हो, माझ्या बाजूने थोडं 'अटॅचमेंट' नक्कीच होतं. जेव्हा लोक भेटतात, तेव्हा आधी एक ओढ निर्माण होते, मग प्रेमही होऊ शकतं. कदाचित ते प्रेम नव्हतं, पण मी त्याला 'वन नाईट स्टँड' म्हणू शकते."
advertisement
बॉबीने हे देखील सांगितलं की, जेव्हा तिने याबद्दल मीडियामध्ये बोलण्यास सुरुवात केली, तेव्हा तिच्या आणि मुनाफमध्ये सर्वकाही संपलं. तिने सांगितलं, "जेव्हा मी ही गोष्ट सार्वजनिक केली, तेव्हा मुनाफने मला सांगितलं की, यामुळे त्याची बदनामी होईल. तो म्हणाला की, बाकीचे क्रिकेटर्स काय विचार करतील, काय म्हणतील. त्यावर मी त्याला म्हणाले की, 'जेव्हा मी तुला फोन करते, तेव्हा तू माझा फोनही उचलत नाहीस. आता मी इतकी घाणेरडी झाली का? आणि बेडमध्ये मी तुला लोण्यासारखी वाटले होते?'" बॉबीच्या म्हणण्यानुसार, याच कारणामुळे त्यांचं नातं तिथेच संपुष्टात आलं.
advertisement
सध्या, मुनाफ पटेल यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यांनी बॉबी डार्लिंगच्या दाव्याबद्दल कोणतंही विधान केलेलं नाही किंवा सोशल मीडियावरही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या खुलाशानंतर सेलिब्रिटींच्या आयुष्यातील खासगी संबंध कसे आणि कधी चर्चेचे विषय बनतात, याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.