'त्या व्यक्तीने मला प्रायव्हेट पार्ट दाखवला', राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीचा लैंगिक छळ, सांगितला 'तो' भयावह प्रसंग
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Famous Actress Faced Harassment : प्रसिद्ध अभिनेत्रीला लैंगिक छळाचा सामना करावा लागला होता. अभिनेत्रीने नुकतंच एका मुलाखतीत याबाबत भाष्य केलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
पार्वतीने सांगितले की, तिच्या बालपणी अनेकदा तिच्यासोबत गैरवर्तन झाले. कधी ऑटोरिक्षात बसताना कुणी चिमटा काढला, तर कधी रेल्वे स्टेशनवर आईला सोडून वडिलांसोबत परत येत असताना एका अनोळखी व्यक्तीने तिच्या छातीवर जोरात हात मारला आणि पळ काढला. तो फक्त स्पर्श नव्हता, इतका जोरात मारले गेले की ती वेदनेने किंचाळली. त्या वेळी ती फारच लहान होती आणि नेमके काय घडते आहे हे तिला कळत नव्हते, पण भीती आणि वेदना आजही तिला स्पष्ट आठवतात.
advertisement
advertisement
advertisement
पार्वतीने मल्याळम, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘टेक ऑफ’, ‘उयिरे’, ‘करीब करीब सिंगल’, ‘चार्ली’, ‘मरियन’ आणि ‘बंगलोर डेज’ हे तिचे काही लोकप्रिय चित्रपट आहेत. तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला असून ती नेहमीच सशक्त भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाते. ‘द स्टॉर्म’ या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे.







