Hansika Motwani Love Story: बेस्ट फ्रेंडच्या पतीवर झालं प्रेम, घर तोडून थाटला संसार, आता अडीच वर्षांत घटस्फोटापर्यंत पोहोचलं नातं
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Hansika Motwani Love Story: 'शकालाका बूम बूम'मधून बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री हंसिका मोटवानी. आज तिचा 33 वा वाढदिवस आहे. याचनिमित्ताने तिच्याविषयी जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
जेव्हा हंसिका आणि सोहेलने त्यांच्या नात्याची घोषणा केली, तेव्हा अनेकांनी हंसिकाला 'घर तोडणारी' म्हणून ट्रोल केले. हंसिका आणि सोहेल यांच्या प्रेमाची सुरुवात 2021 मध्ये झाली. एकमेकांना एक वर्ष डेट केल्यानंतर, सोहेलने 2022 मध्ये पॅरिसमधील आयफेल टॉवरसमोर हंसिकाला फिल्मी स्टाईलमध्ये लग्नासाठी प्रपोज केले.
advertisement
त्यानंतर, 2022 मध्येच राजस्थानमधील जयपूर येथील ऐतिहासिक मुंडोटा फोर्ट अँड पॅलेसमध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. या लग्नात फक्त जवळचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होते. हंसिकाने खास लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता, तर सोहेलनेही पारंपरिक वेशभूषा केली होती. लग्नानंतर त्यांनी सोशल मीडियावर अनेक रोमँटिक फोटो शेअर केले, ज्यांना चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले.
advertisement







