Girija Oak: आर्यनच्या अटकेनंतर कशी होती शाहरुखची अवस्था? गिरीजा ओकने पहिल्यांदाच सांगितला 'जवान'च्या सेटवरील 'तो' किस्सा

Last Updated:
आर्यनच्या अटकेनंतर शाहरुख कोणत्या मनस्थितीतून जात होता? त्याच्या कामावर याचा काय परिणाम झाला? याबद्दल आता अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले हिने काही खळबळजनक खुलासे केले आहेत.
1/8
मुंबई: बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान पडद्यावर कितीही मोठा सुपरस्टार असला, तरी शेवटी तो एक बाप आहे. २०२१ मध्ये जेव्हा त्याचं कुटुंब आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे वादळाच्या तडाख्यात सापडलं होतं, तेव्हा जगभरात चर्चा सुरू होत्या.

advertisement
2/8
पण या काळात स्वतः शाहरुख कोणत्या मनस्थितीतून जात होता? त्याच्या कामावर याचा काय परिणाम झाला? याबद्दल आता अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले हिने काही खळबळजनक खुलासे केले आहेत.

3/8
गिरीजा ओकने शाहरुखसोबत 'जवान' या ब्लॉकबस्टर सिनेमात जवळपास दोन वर्ष काम केलं. एका मुलाखतीत तिने सांगितलं की, सेटवर शाहरुख केवळ एक सहकलाकार म्हणून नाही, तर एक कुटुंबप्रमुख म्हणून वागायचा.

4/8
गिरीजा सांगते,
गिरीजा सांगते, "शूटिंगच्या गडबडीत मला माझ्या मुलाला भेटायला वेळ मिळत नव्हता, त्याबद्दल मी इतर कलाकारांशी बोलत होते. तेवढ्यात शाहरुख तिथे आला आणि तोही आपल्या मुलांबद्दल भरभरून बोलू लागला. तो म्हणाला, 'मलाही माझ्या मुलांना नीट भेटता येत नाही. अबराम शाळेत असतो, सुहाना आणि आर्यन त्यांच्या कामात. म्हणूनच मी सुहानाला कधीकधी सेटवरच बोलावून घेतो.'"
advertisement
5/8
ऑक्टोबर २०२१ मध्ये जेव्हा आर्यन खानला क्रूझवर अटक करण्यात आली, तेव्हा संपूर्ण देश हादरला होता. याच काळात 'जवान'चं शूटिंग सुरू होतं. गिरीजा सांगते की, त्या ३-४ महिन्यांच्या काळात शाहरुख पूर्णपणे बदलला होता.

6/8
केस सुरू असताना शाहरुखने 'जवान'चं शूटिंग अनिश्चित काळासाठी थांबवलं होतं. तो कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नव्हता किंवा मीडियालाही सामोरं जात नव्हता. सेटवरच्या लोकांसाठीही तो त्या काळात अनरिचेबल झाला होता. कोणालाच त्याच्याशी संपर्क साधता येत नव्हता.

7/8
गिरीजाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा आर्यनची केस मिटली आणि परिस्थिती निवळली, त्यानंतरच 'जवान'ची टीम पुन्हा शाहरुखला भेटू शकली. तोपर्यंत त्याने कोणालाही त्याला भेटू दिलं नव्हतं.

8/8
२ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझवर एनसीबीने छापा टाकला होता. ज्याचं नेतृत्व समीर वानखेडे करत होते. या धाडीत आर्यन खानला ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर त्याला तब्बल २५ दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं.

BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement