advertisement

सर्वाधिक फी घेणारी अभिनेत्री, एका चित्रपटासाठी घेते 10 कोटी; कोण आहे ती?

Last Updated:
कर्नाटकातल्या एका छोट्या शहरातून ते फक्त देशामध्येच नाही जगभरामध्ये आपला फॅनबेस बनवणारी अभिनेत्री, पत्रकारितेची विद्यार्थिनी ते 'नॅशनल क्रश'पर्यंत ही अभिनेत्री पोहोचली आहे. एकेकाळी एका चित्रपटासाठी लाखो रुपये मानधन घेणारी ती अभिनेत्री आता एका चित्रपटासाठी 10 कोटी रुपये कमावते, कोण आहे ती अभिनेत्री?
1/8
 आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या रश्मिका मंदान्ना हिने भारतासह जगभरात मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. टॉलिवूडसह बॉलिवूडमध्येही सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमध्ये तिचा समावेश झाला होता. तिने आपल्या अभिनयाचा ठसा दोन्हीही इंडस्ट्रीमध्ये पाडला आहे. फक्त सौंदर्यासाठीच नाही तर, ती तिच्या कामातही चांगलीच चर्चेत आहे.

2/8
 एप्रिल 1996 मध्ये कर्नाटकातील विराजपेट मधील एका मध्यमवर्गीय कोडावा हिंदू कुटुंबात जन्मलेल्या रश्मिकाने अगदी साधं- सिंपल आयुष्य जगली. तिचा प्रवास सामान्य कुटुंबातल्या प्रत्येक मुलीसाठी प्रेरणा देतो. सामान्य कुटुंबातली मुलगी सुद्धा फार मोठी अभिनेत्री होऊ शकते, असं रश्मिकाने करून दाखवलं. रश्मिकाची फॅन फॉलोविंग मोठ्या प्रमाणावर आहे.

3/8
 चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी, रश्मिकाने अनेक विषयांमध्ये डिग्री घेतलेली आहे, फक्त अभिनयातच नाही तर, शिक्षणातही रश्मिका फार हुशार आहे. वेगवेगळ्या विषयांमध्ये घेतलेल्या पदव्यांमुळे रश्मिकाला तिच्या संवाद कौशल्य सुधारण्यात आणि तिचा आत्मविश्वास वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. महाविद्यालयीन काळात, तिने मॉडेलिंगमध्ये आणि ब्यूटीबाबतीत स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. या अनुभवांमुळे तिच्यासाठी अभिनयामध्ये संधींचे दरवाजे उघडले.

4/8
 रश्मिकाने 2016 मध्ये 'किरिक पार्टी' या कन्नड चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हा तिचा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला आणि त्यामुळे ती तरुणांमध्ये लगेचच लोकप्रिय झाली. फिल्मी करियरमध्ये रश्मिकाला 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखही मिळाली. चित्रपटाच्या सक्सेसने तिला खूप चांगली इमेज तयार करून दिली. त्यानंतर तिच्या हातात अनेक खूप चांगले आणि सुपरहिट चित्रपट तिला मिळत गेले.

5/8
 कन्नड चित्रपटांमध्ये ओळख मिळवल्यानंतर, रश्मिकाने तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतही काम केले. गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. प्रेक्षकांनी तिच्या दमदार अभिनयाची आणि पडद्यावरच्या अभिनय कुशलतेची कायमच प्रशंसा केली, ज्यामुळे तिला 'नॅशनल क्रश' म्हणून ओळख मिळाली आहे.

6/8
 भारतासह जगभरामध्ये ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'पुष्पा' चित्रपटातून तिला आणखीनच प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटामध्ये तिने मुख्य सुपरस्टार्ससोबत काम केले. नंतर तिने अ‍ॅनिमल, गुडबाय, मिशन मजनू आणि थम्मा सारख्या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि हिंदी भाषिक प्रेक्षकांकडूनही तिला कौतुकाची थाप मिळाली.

7/8
 रश्मिका मंदान्नाची दक्षिणेत सर्वाधिक मानधन घेणार्‍या अभिनेत्रींमध्ये गणना होते. रिपोर्ट्सनुसार, तिने 'पुष्पा'च्या पहिल्या भागासाठी 2 कोटी रुपये घेतले होते. तर, सिक्वेलसाठी तिने 10 कोटी रुपये मानधन घेतल्याचे बोलले जात होते. रणबीर कपूर अभिनीत 'अ‍ॅनिमल' चित्रपटासाठी तिने 4 कोटी रुपये मानधन कमावले होते.

8/8
 गेल्या काही दिवसांपासून विजय- रश्मिकाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या 26 फेब्रुवारीला हे कपल लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. 24 फेब्रुवारीला हळद आणि 25 फेब्रुवारीला संगीतचा कार्यक्रम असण्याची शक्यता आहे.

करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement