Sakshi Tanwar: 25 वर्षांनी तुलसी परत आली, पण पार्वती कुठेय? आता अशी दिसते!

Last Updated:
Sakshi Tanwar: 'कहानी घर घर की' मधील पार्वती आठवतेय का? पार्वती 25 वर्षांनी इतकी बदलली आहे की तिचे फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल.
1/7
'क्योकी सास भी कभी बहु थी' या मालिकेचा दुसरा भाग सध्या सुरु आहे. यामध्ये अनेक वर्षांनी तुलसी म्हणजेच स्मृती इराणी परतल्या. मात्र 'कहानी घर घर की' मधील पार्वती आठवतेय का? पार्वती 25 वर्षांनी इतकी बदलली आहे की तिचे फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल.

advertisement
2/7
हिंदी टेलिव्हिजनच्या जगात जर कधी एखाद्या अभिनेत्रीने घराघरात आपली वेगळी छाप पाडली असेल, तर ती पार्वती म्हणजे साक्षी तंवर.‘कहानी घर घर की’ या मालिकेत पार्वती अग्रवालची भूमिका साकारून ती थेट प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली.

3/7
आजही प्रेक्षकांना पार्वतीची साधेपणा आणि अभिनयशैली आठवते. साक्षी तंवर ही राजस्थानमधील अलवरची आहे. तिचे वडील सीबीआय अधिकारी होते. घरात शिक्षणाला प्राधान्य असल्यामुळे साक्षी सुरुवातीला प्रशासकीय सेवेत जायचे स्वप्न पाहत होती.

4/7
केंद्रीय विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजमधून पदवी मिळवली. अभ्यासात हुशार असल्याने ती आयएएसची तयारीही करत होती. पण नशिबात काहीतरी वेगळेच लिहिलेले होते.

5/7
शिक्षणादरम्यान खर्चासाठी तिने पंचतारांकित हॉटेलमध्ये सेल्स ट्रेनी म्हणून नोकरी केली. त्याच काळात एका मैत्रिणीने तिला दूरदर्शनवरील ‘अलबेला सूर मेळा’ या शोच्या ऑडिशनबद्दल सांगितले. मजेतच ऑडिशन द्यायला गेलेली साक्षी निवडली गेली आणि तिच्या आयुष्याला नवा वळण मिळाले.

6/7
खऱ्या अर्थाने प्रसिद्धी तिला एकता कपूरच्या ‘कहानी घर घर की’ या मालिकेतून मिळाली. पार्वती अग्रवालची भूमिका इतकी लोकप्रिय झाली की, साक्षीला ‘टीव्हीची आदर्श बहू’ म्हणून ओळख मिळाली. पुढे ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेत राम कपूरसोबतची तिची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेली.

7/7
फक्त मालिकांमध्येच नाही तर साक्षीने बॉलिवूडमध्येही पाऊल टाकले. ‘दंगल’ चित्रपटात आमिर खानच्या पत्नीची भूमिका तिने उत्तम प्रकारे साकारली. तिच्या गंभीर आणि भावनिक अभिनयाने प्रेक्षक भारावून गेले. याशिवाय तिने वेबसीरिजमध्येही काम केले आहे.

OTT Movies: तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; हे आहेत बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
    View All
    advertisement