Devi Temple in pune : मराठा साम्राज्याच्या काळात पुण्यात बांधलं हे देवीचं मंदिर, दुसरं आहे पेशवेकालीन! खास PHOTOS
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
नवरात्रीत देवीची आराधना केली जाते. या काळात देवीचे दर्शन घेतल्याने इच्छित फळ मिळते, अशी मान्यता आहे. पुण्यातही अनेक प्राचीन देवी मंदिरे आहेत.
advertisement
advertisement
advertisement
जम्मूच्या वैष्णोदेवी मंदिराची प्रतिकृती असलेले देवीचे मंदिर पुण्यातही आहे. पुण्यात पिंपरी येथे हे वैष्णोदेवीचे मंदिर आहे. हे पुण्यातील सर्वात प्रसिद्ध दुर्गा माता मंदिरांपैकी एक आहे. जम्मूच्या वैष्णो देवी मंदिरासारखीच शांतता इथे अनुभवायला मिळते. खास गोष्ट म्हणजे या मंदिरात गुफाही आहे. मंदिराच्या सभामंडपात प्रवेश केल्यांनंतर गाभाऱ्याकडे जाण्यासाठी एक गुफा बनवली गेली आहे.
advertisement
advertisement
तळजाई देवी मंदिर हे सुमारे 400 वर्षांपूर्वीचे असून पुण्याच्या इतिहासाशी घट्ट नातं सांगणारं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी राजमाता जिजाबाईंनी येथे देवीचे दर्शन घेतल्याची कथा प्रसिद्ध आहे.पुण्याच्या पश्चिमेकडून दक्षिणेकडे पर्वतरांगांची सुरुवात पर्वती टेकडीपासून होते आणि याच डोंगररांगांमध्ये तळजाईचे पठार व तळजाई देवीचे मंदिर वसलेले आहे.
advertisement
सारसबाग परिसरातील श्री महालक्ष्मी मंदिराची स्थापना बन्सीलाल रामनाथ अग्रवाल यांनी 1981 साली केली. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे आदि पराशक्तीची तीन रूपे श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी आणि श्री महाकाली एकत्र विराजमान आहेत. विद्येची अधिष्ठात्री महासरस्वती, समृद्धीची अधिष्ठात्री महालक्ष्मी आणि सत्य व चैतन्याची अधिष्ठात्री महाकाली या त्रिदेवतांचे दर्शन एकाच ठिकाणी घेता येते. त्यामुळे या मंदिराला पुण्यात एक वेगळे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.