प्रथमेश कदमच्या मृत्यूनंतर खचली आई, अफवांना हतबल होऊन अखेर सांगितलं मुलाच्या मृत्यूचं खरं कारण, VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Influancer Prathamesh Kadam Mother Video After his Death : प्रथमेशच्या मृत्यूनंतर जवळपास 15 दिवसांनी प्रथमेशच्या आईनं व्हिडीओ शेअर करत त्याच्या मृत्यूचं खरं कारण सांगितलं. प्रथमेशचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अखेर समोर आलं.
26 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं निधन झालं. त्याच्या निधनाने सगळ्यांनाच शॉक बसला. प्रथमेश आणि त्याची आई प्रज्ञा कदम सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ शेअर करायचे. मायलेकाच्या जोडीला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत होती. पण अचानक प्रथमेशच्या निधनाची माहिती समोर आली आणि सगळेच शॉक झाले. प्रथमेशला नेमकं काय झालं होतं? त्याच्या मृत्यूचं कारण काय असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. प्रथमेशच्या मृत्यूनंतर जवळपास 15 दिवसांनी प्रथमेशच्या आईनं व्हिडीओ शेअर करत त्याच्या मृत्यूचं खरं कारण सांगितलं.
प्रथमेशची आई प्रज्ञा कमद यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी मुलाच्या मृत्यूचं खरं कारण सांगत कोणत्याही अफवा न पसरवण्याचं आवाहन केलं आहे. प्रज्ञा कदम यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं, "नमस्कार मी प्रज्ञा प्रकाश कदम. प्रथमेशची मम्मी. काही दिवसांपासून मला खूप त्रास होत होता. प्रथमेशने आत्महत्या केली, प्रथमेशला हे झालं ते झालं असे व्हिडीओ येत होते. त्याला असं काहीही झालं नव्हतं. खरं कारण त्याचं एकच होतं त्याच्या ब्लडमध्ये रक्ताची कावीळ मिसळली होती. ती कावीळ म्हणजे सफेद कावीळ असते ती कोणालाही कळत नाही."
advertisement
"जेव्हा मी त्याला अॅडमिट केलं तेव्हा डॉक्टरांनी गॅरेंटी दिली होती. डॉक्टर बोलले दोन-तीन दिवसात तो कव्हर होईल. त्याचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे. पण कावीळने घात केला माझ्या मुलाचा. डॉक्टरांना पण कळालं नाही. शेवटच्या क्षणी डॉक्टरांना कळलं की त्याच्या रक्तामध्ये सफेद कावीळ झाली होती."
advertisement
advertisement
मुलाबद्दल बोलताना प्रज्ञा कदम यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी पुढे सांगितलं, "डॉक्टर बोलले आपण बघूया. त्याच्या पूर्ण शरीरभर त्याच्या रक्ताची कावीळ मिसळली होती. तेव्हा डॉक्टर मला बोलले आता तुम्ही देवाला प्रार्थना करा. तेव्हा मी खचून गेली. मी म्हटलं आता काही गॅरंटी नाही माझ्या मुलाची. ती कावीळ पूर्ण रक्तामध्ये मिसळली की माणूस शेवटी एंडच होतो आणि तेच झालं. 26 जानेवारीला सकाळी प्रथमेशने जगाचा निरोप घेतला. मला खूप त्रास झाला आम्हाला. त्याचे चाहते आहेत त्या सर्वांना खूप त्रास झाला."
advertisement
प्रज्ञा कदम यांनी सर्वांना अफवा न पसरवण्याचं आवाहन केलं. त्या म्हणाल्या, "मी सर्वांना हात जोडून विनंती करते कोणतीही खोटी अफवा पसरवू नका. कोणी काही बोलेल त्याच्यावर लक्ष देऊ नका. प्लीज आम्हाला मला माझ्या मुलीला मेसेज करुन विचारू नका की काय आणि कसं झालं ते? तुमचा जो गैरसमज होता तो मी आता दूर केलाय, व्हिडीओ बनवण्याचं कारण हेच आहे. प्रथमेशचं फक्त रक्तातल्या कावीळमुळे निधन झालं बाकी त्याला काहीही नव्हतं. प्लीज कोणती अफवा पसरवू नका."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 4:38 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
प्रथमेश कदमच्या मृत्यूनंतर खचली आई, अफवांना हतबल होऊन अखेर सांगितलं मुलाच्या मृत्यूचं खरं कारण, VIDEO









