advertisement

बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी अभिनेत्रीने रचला स्वतःच्याच मृत्यूचा बनाव, पतीला फसवून निघाली, पण पुढे जे झालं...

Last Updated:
Marathi Actress Scandal : एका मराठमोळ्या विवाहित अभिनेत्रीने प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. तिचा नवरा अडथळा होता. ही घटना मराठी सिनेसृष्टीत गाजली होती.
1/6
मुंबई: सध्याच्या काळात नात्यांमधील गुंतागुंत आणि त्यातून घडणाऱ्या धक्कादायक घटना नेहमीच समोर येत असतात. अनेकदा पत्नी प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी किंवा पतीपासून सुटका मिळवण्यासाठी टोकाची पाऊले उचलते. अशाच एका थरारक घटनेने एकेकाळी मराठी सिनेसृष्टीला हादरवून टाकलं होतं, जेव्हा एका अभिनेत्रीने प्रियकरासोबत लग्न करण्याच्या उद्देशाने, स्वतःच्याच मृत्यूचा एखाद्या सिनेमात शोभावा असा बनाव रचला. ही अभिनेत्री कोण होती आणि तिचा हा 'मास्टर प्लॅन' कसा फसला, ते जाणून घेऊया.

2/6
मराठी अभिनेत्री अलका पुणेवार हिने तिचा प्रियकर आलोक पालीवाल याच्यासोबत विवाह करण्यासाठी, स्वतः 'बेपत्ता' झाल्याचा एक कट रचला. मुंबई पोलिसांनी मोठ्या कौशल्याने या कटाचा पर्दाफाश केला. तपास सुरू असताना, अलका तिच्या प्रियकर आलोकसोबत चक्क चेन्नईमध्ये सापडली! घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन, पोलिसांनी तातडीने एक पथक चेन्नईला पाठवून त्या दोघांनाही मुंबईत आणलं. अलकाने आलोक आणि त्यांचा मित्र संजीव कुमार सोनकर यांच्या मदतीने हा संपूर्ण बनाव तयार केला होता.

3/6
४४ वर्षीय अलका पुणेवार, जी 'गदर' आणि 'बवंडर' यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच काही टीव्ही मालिकांमध्ये झळकली होती, ती २७ डिसेंबर २०१३ रोजी उरणमधील एका पार्टीत सहभागी होण्यासाठी घरातून निघाली. तिची योजना होती की, तिथून तिने पुण्यामार्गे चेन्नईला जायचं. दोन दिवसांनी, म्हणजे २९ डिसेंबर रोजी, तिची गाडी मुंबई-पुणे एक्सप्रेसवे जवळ, खोपोली येथे एका ९०० फूट खोल खड्ड्यात पडलेली अवस्थेत सापडली. पोलिसांनी या 'अपघाता'चा तपास सुरू केला, तेव्हा त्यांना सुरुवातीला संजीव कुमारला पकडण्यात यश आलं.

4/6
संजीवने पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक खुलासे केले. त्याने सांगितलं की, २४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या आलोक आणि अलका यांचे गेल्या एक वर्षापासून प्रेमसंबंध सुरू होते. दोघांनाही लग्न करायचं होतं, पण अलकाचा नवरा संजय पुणेवार त्यांच्या मार्गात मोठा अडथळा होता. म्हणूनच त्यांनी हा शॉकिंग कट रचला. संजीवने पुढे सांगितलं की, २७ डिसेंबर रोजी संजयने अलकाला ठाण्यातील आनंद थिएटरमध्ये सोडलं. त्यावेळी त्याने संजयला सांगितलं की, त्याचा ड्रायव्हर अलकाला उरण येथे सोडेल. संजय गेल्यानंतर, पूर्वनियोजित योजनेनुसार, आलोक, संजीव आणि अलका ठाणे रेल्वे स्टेशनबाहेर भेटले. तेथून तिघेही नवी मुंबईतील संजीवच्या घरी गेले, जिथे रात्री पार्टी होती. त्यानंतर अलका तेथून चेन्नईला रवाना झाली. आलोक आणि संजीव तिच्या गाडीने खोपोलीकडे निघाले.

5/6
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर एका ठिकाणी त्यांची गाडी पंक्चर झाली. याच वेळी, आलोकने अलकाच्या फोनवरून संजयला एक एसएमएस पाठवला, ज्यात त्याच्या मुलाचा रिझ्युम मेल करण्याची विनंती होती. त्यानंतर दोघेही खोपोलीला पोहोचले. तिथे त्यांनी अलकाची गाडी चक्क ९०० फूट खोल खड्ड्यात ढकलून दिली. हा अपघातच आहे, हे भासवण्यासाठी त्यांनी अलकाचा मोबाईल फोनही तिथेच टाकला. त्यानंतर दोघांनीही ट्रक चालकांना थांबवून गाडी खड्ड्यात पडल्याची खोटी माहिती दिली. ट्रक चालकांनी वाहतूक पोलिसांना कळवल्यावर तपास सुरू झाला.

6/6
पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगाने फिरवली. त्यांनी सुरुवातीला आलोकचा मोबाईल नंबर ट्रेस केला, तेव्हा त्याचं लोकेशन आंध्र प्रदेशात दिसलं. त्यानंतर त्यांना एक दुसरा नंबर सापडला, ज्यावरून आलोकच्या नंबरवर सतत बोलणं सुरू होतं. हा नंबर संजीवचा होता. पोलिसांनी संजीवला ताब्यात घेतलं आणि कठोर चौकशी केल्यावर त्याने या संपूर्ण 'सिनेमाई' कटाचं बिंग फोडलं, ज्यामुळे अलका पुणेवारच्या मृत्यूचा बनाव उघडकीस आला. ही घटना त्यावेळी खूप गाजली होती.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement