advertisement

हातावर मेहंदी, औक्षण; मास्टर ब्लास्टरने कशी सेलिब्रेट केली एनिवर्सरी, लेक साराने शेअर केले फोटो

Last Updated:
Sachin-Anjali Wedding Anniversary: सचिन तेंडुलकर नाव उच्चारलं की डोळ्यांसमोर उभं राहतं क्रिकेटच्या मैदानावर बॅटने इतिहास रचणारं एक शांत, पण धगधगतं व्यक्तिमत्त्व. सचिनने अंजलीसोबत विवाह केला.
1/7
सचिन तेंडुलकर नाव उच्चारलं की डोळ्यांसमोर उभं राहतं क्रिकेटच्या मैदानावर बॅटने इतिहास रचणारं एक शांत, पण धगधगतं व्यक्तिमत्त्व. सचिनने अंजलीसोबत विवाह केला. लेक साराने नुकताच त्यांच्या एनिवर्सरीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

2/7
24 मे 1995 मध्ये सचिन तेंडुलकर आणि अंजलीने लग्नगाठ बांधली होती. त्यांनी नुकतीच त्यांच्या लग्नाच्या एनिवर्सरी साजरी केली. या सेलिब्रेशनचे खास फोटो साराने इंस्टाग्रामवर शेअर केलेत. जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

3/7
साराने शेअर केलेल्या फोटोमध्ये औक्षणाचं ताट, मेंहंदी, फुलं असं छान सेलिब्रेशन सचिन आणि अंजली यांनी केलं. फोटो पाहून अगदी साध्या पद्धतीने हे सेलिब्रेशन झाल्याचं पहायला मिळतंय.

4/7
1990 साल, मुंबई विमानतळावर पहिल्यांदा अंजलीने सचिनला पाहिलं. पहिल्या नजरेत ती सचिनच्या प्रेमात पडली. तिनं त्याच्या घरी बनावट पत्रकार म्हणून जाऊन त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. हो, ती गंमत होती पण त्यातच त्यांचं प्रेम उगम पावत होतं.

5/7
त्यानंतर पुढची पाच वर्षं ते दोघं प्रेमात होते, पण कोणताही चित्रपट एकत्र पाहिला नव्हता. त्यांच्या प्रेमाचा पहिला साक्षीदार ठरला मणिरत्नमचा 'रोजा'. आज त्या चित्रपटाला वेगळीच रोमँटिक आठवण जोडली गेलीय.

6/7
अंजलीचं सचिनवरचं प्रेम इतकं तीव्र होतं की जेव्हा तो फलंदाजीला जायचा, ती कोणाशीही बोलायची नाही, काही खायची नाहीतिचं प्रेम हीच त्याच्या करिअरची गुप्त ताकद होती. अंजलीने स्वतःच्या डॉक्टरीच्या झगमगाटाला बाजूला सारून, संपूर्ण आयुष्य सचिनच्या पाठीशी उभं राहण्यास दिलं.

7/7
दरम्यान, यंदा दोघांनी लग्नाचा 30 वा वाढदिवस साजरा केला. साराने एनिवर्सरीचे फोटो शेअर करत लिहिलं, "तुम्ही दोघांनी मिळून एक असं जीवन निर्माण केलं आहे जे आमच्यासाठी प्रेरणा देणारं प्रेम आहे."

Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement