लग्न करावं की नाही? प्राजक्ता माळीला पडला प्रश्न, श्री श्री रवीशंकरांनी दिलं उत्तर, म्हणाले 'लग्न करून दुःखी...'

Last Updated:
Prajakta Mali : प्राजक्ताने एकदा श्री श्री रविशंकर यांना लग्नाबाबत एक प्रश्न विचारला होता. तिचा हा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
1/8
आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना भुरळ घालणारी प्राजक्ता सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. प्राजक्ता तिच्या कामा इतकीच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते.
आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना भुरळ घालणारी प्राजक्ता सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. प्राजक्ता तिच्या कामा इतकीच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते.
advertisement
2/8
अभिनयाबरोबरच तिचा अध्यात्माकडेही मोठा कल आहे. यामुळेच तिने 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चा कोर्सही पूर्ण केला आहे. प्राजक्ता तिच्या व्यस्त जीवनशैलीतून वेळ काढून अनेकदा श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमाला भेट देते.

3/8
दरम्यान, प्राजक्ताने एकदा श्री श्री रविशंकर यांना लग्नाबाबत एक प्रश्न विचारला होता. तिचा हा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
दरम्यान, प्राजक्ताने एकदा श्री श्री रविशंकर यांना लग्नाबाबत एक प्रश्न विचारला होता. तिचा हा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
advertisement
4/8
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्राजक्ता माळी श्री श्री रविशंकर यांना विचारते,
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्राजक्ता माळी श्री श्री रविशंकर यांना विचारते, "महाराज, आयुष्यात खरंच लग्न करणं गरजेचं आहे का?" प्राजक्ताच्या या प्रश्नावर सुरुवातीला श्री श्री रविशंकर हसले आणि त्यांनी मजेशीर अंदाजात उत्तर दिलं.
advertisement
5/8
ते म्हणाले,
ते म्हणाले, "हा प्रश्न तुम्ही मला विचारताय? जर असं असतं, तर माझ्या बाजूला आणखी एक खुर्ची लागली असती. मला एक सोफा लावावा लागला असता."
advertisement
6/8
त्यांच्या या उत्तरावर तिथे उपस्थित असलेले सगळेच हसू लागले. त्यानंतर थोडा विचार करून श्री श्री रविशंकर यांनी प्राजक्ताला गंभीरपणे उत्तर दिलं. ते म्हणाले,
त्यांच्या या उत्तरावर तिथे उपस्थित असलेले सगळेच हसू लागले. त्यानंतर थोडा विचार करून श्री श्री रविशंकर यांनी प्राजक्ताला गंभीरपणे उत्तर दिलं. ते म्हणाले, "अशी काही आवश्यकता नाही. लग्न करून असो किंवा एकट्याने असो, फक्त आनंदी राहिलं पाहिजे."
advertisement
7/8
ते पुढे म्हणाले,
ते पुढे म्हणाले, "काही लोक असे असतात, जे लग्न करूनही दुःखी असतात आणि एकटेही दुःखीच असतात. तर काही लोक लग्न न करताही आनंदी राहतात आणि लग्न करूनही आनंदी राहतात. त्यामुळे हे तुम्ही ठरवा की, तुम्हाला काय आवडतं."
advertisement
8/8
श्री श्री रविशंकर यांनी शेवटी प्राजक्ताला आणि सगळ्यांनाच एक मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले,
श्री श्री रविशंकर यांनी शेवटी प्राजक्ताला आणि सगळ्यांनाच एक मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, "माझ्या मते, आनंदी राहण्याचा पर्याय सर्वांनी निवडायला हवा." त्यांच्या या उत्तरामुळे प्राजक्ता माळी आणि तिच्या चाहत्यांनाही त्यांच्या प्रश्नाचं एक समाधानकारक उत्तर मिळालं आहे.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement