Smita Patil : अपूर्णच राहिली स्मिता पाटील यांनी पाहिलेली 'ती' तीन स्वप्ने; काय होती अभिनेत्रीची इच्छा?
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
आपल्या निखळ सौंदर्य आणि नैसर्गिक अभिनयाने चित्रपटरसिकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांची आज 68 वी जयंती. अवघ्या 31 व्या वर्षी जगाचा स्मिता पाटील यांनी जगाचा निरोप घेत या अभिनेत्रीने सगळ्यांनाच हुरहूर लावली. अवघ्या 31 वर्षात या अभिनेत्रीने यशाची वेगळीच उंची गाठली असली तरी स्मिता पाटील यांना आयुष्यात खूप काही करायचं होतं. त्यांची खूप स्वप्ने होती. त्यातील काही स्वप्ने साकार झाली. पण काही स्वप्ने अखेर अधुरीच राहिली. आज स्मिता पाटील यांच्या त्या अधुऱ्या स्वप्नांबद्दल जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
स्मिताची आई विद्या हिने लग्नानंतर हलाखीचे दिवस पाहिले. स्मिताचा जन्म झाला तेव्हा तिच्या आईला परिचारिका म्हणून काम करावे लागले. लहानपणी आई पैशाअभावी अस्वस्थ व्हायची तेव्हा स्मिता तिला सांगायची, 'मी मोठी होईन तेव्हा खूप पैसे कमावेन.' इतकंच नाही तर विद्या ताईंना वनस्पती आणि हिरवाईची खूप आवड होती. त्यांनी आपल्या छोट्याशा घरात अनेक फुलांची भांडी ठेवली होती.
advertisement
advertisement
स्मिता पाटील यांच्या अभिनयाने दिग्दर्शक श्याम बेनेगल नेहमीच भारावून जायचे. इतकंच नाही तर स्मिता एक दिवस खूप चांगली दिग्दर्शिका बनेल, तिच्यावर दिग्दर्शकाचा डोळा असल्याचेही त्यांनी सांगितले. स्मिताची इच्छा होती की तिने आपल्या पद्धतीने चित्रपट दिग्दर्शित करावा. पण सत्तर आणि ऐंशीच्या दशकात त्यांच्याकडे अभिनयाचं एवढं काम होतं की त्यांना दिग्दर्शक व्हायला वेळच मिळाला नाही.
advertisement
advertisement
advertisement