Tejashree Pradhan : 'त्याने मला खूप...', पहिल्याच चित्रपटात तेजश्री प्रधानने दिलेला किसिंग सीन, कोण होता तो अभिनेता?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Tejashree Pradhan : तेजश्री प्रधान म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर येते ती सोज्वळ आणि सालस भूमिका करणारी अभिनेत्री. पण तिच्या पहिल्याच बॉलिवूड चित्रपटात तेजश्रीने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.
अभिनेत्री तेजश्री प्रधान लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती सध्या 'झी मराठी'वरील 'वीण दोघांतली ही तुटे ना' या तिच्या नवीन मालिकेमुळे चर्चेत आहे. अशातच ही मालिका हिंदीतील गाजलेल्या 'बडे अच्छे लगते है'ची मराठी रिमेक असल्याचं बोललं जातंय. यामुळेच मालिकेवर काही प्रमाणात टिकाही करण्यात येत आहे.
advertisement
advertisement
advertisement
या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता शर्मन जोशी तिच्यासोबत मुख्य भूमिकेत होता. शर्मन आणि तेजश्रीचा या चित्रपटातील किसिंग सीन खूप गाजला. तिच्या चाहत्यांना हा सीन पाहून धक्का बसला, कारण त्यांच्या 'साध्या-भोळ्या' अभिनेत्रीने असं काही करावं हे मराठी प्रेक्षकांच्या पचनी पडलं नाही. काही जणांनी मात्र तिच्या वेगळ्या धाटणीच्या भूमिकेसाठी आणि तिच्या हिमतीचं कौतुकही केलं.
advertisement
advertisement
सीन करताना शर्मनने तिला खूप कम्फर्टेबल वाटू दिलं, असंही तेजश्रीने सांगितलं. "सीन करताना शर्मनने मला कम्फर्टेबल केलं होतं. त्यामुळे आमची केमिस्ट्री चांगली जुळून आली होती. त्याने मला खूप सांभाळून घेतलं." तसेच, याबाबतीत कोणीही मराठी आणि बॉलिवूड अभिनेत्री असा फरक करू नये असंही मला वाटतं, असं स्पष्ट मत तिने मांडलं होतं.
advertisement
तेजश्री प्रधानच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, 'होणार सून मी ह्या घरची' या 'झी मराठी'वरील मालिकेने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर नेलं. त्यानंतर तिने 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत काम केले. 'मी सध्या काय करते' या सिनेमातही ती दिसली. तिचा 'पंचक' हा सिनेमासुद्धा गाजला. त्यानंतर 'स्टार प्रवाह'वरील 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत ती दिसली होती, पण नंतर तिने ही मालिका अर्धवट सोडली.
advertisement
आता लवकरच तेजश्री आपला 'तदैव लग्नम्' या सिनेमातला सहकलाकार सुबोध भावेसोबत पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर स्क्रीन शेअर करण्यास सज्ज झाली आहे. 'वीण दोघांतली ही तुटे ना' या मालिकेत ही जोडी आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या नवीन मालिकेत तिची भूमिका कशी असेल आणि तिचा हा नवा प्रवास कसा असेल, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.









