राज्याच्या KING ने घातली लग्नाची मागणी, पण ड्रायव्हरच्या प्रेमात होती अभिनेत्री; शेवटी झाला भयानक अंत

Last Updated:
Actress Tragic Life : आपल्या मोहक डोळ्यांनी सगळ्यांना वेड लावणारी ही अभिनेत्री, तिच्या सुंदर डोळ्यांमुळे ‘ड्रीम गर्ल’ म्हणून ओळखली जाते. पण तिच्या आयुष्याचा शेवट एका दुःखद प्रेमकहाणीने झाला
1/9
मुंबई: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अशी काही नावं आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावलं. यापैकीच एक नाव म्हणजे अभिनेत्री टी. आर. राजकुमारी.
advertisement
2/9
आपल्या मोहक डोळ्यांनी सगळ्यांना वेड लावणारी ही अभिनेत्री, तिच्या ‘किलिंग आइज’मुळेदाक्षिणात्य सिनेसृष्टीची पहिली ड्रीम गर्ल म्हणून ओळखली जाते. पण तिच्या आयुष्याचा शेवट एका दुःखद प्रेमकहाणीने झाला, ज्यामुळे ती आयुष्यभर अविवाहित राहिली.
advertisement
3/9
राजकुमारीने तिच्या आयुष्यात कधीच लग्न केलं नाही. ती आपल्या भावंडांसाठी जगली. पण, निर्माता कलाइज्ञानमने तिच्या अविवाहित राहण्यामागचं एक खूपच भावूक कारण एका मुलाखतीत उघड केलं.
advertisement
4/9
एका काळात राजकुमारी यशाच्या शिखरावर होती. त्यावेळी पुदुकोट्टईच्या राजाने तिला लग्नाची मागणी घातली. पण, राजकुमारीने ती नाकारली. तिच्या भावाला, दिग्दर्शक टी. आर. रामन्नाला यावर संशय आला.
advertisement
5/9
त्याने एका गुप्तहेराला कामाला लावलं, ज्याने राजकुमारी आणि तिचा ड्रायव्हर राघवन यांच्या प्रेमप्रकरणाचा खुलासा केला. एके दिवशी कुटुंबाने त्यांना एकत्र पाहिलं आणि राघवनला खूप मारहाण केली.
advertisement
6/9
हे पाहून राजकुमारीने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं. निघताना राघवन म्हणाला होता, “एक दिवस मी राजकुमारीचा प्रियकर आणि नवरा म्हणून परत येईन, तोपर्यंत ती कोणाशीच लग्न करणार नाही.”
advertisement
7/9
त्यानंतर तो गायब झाला. कलाइज्ञानमच्या मते, याच प्रेमकहाणीमुळे राजकुमारी तिच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत अविवाहित राहिली. १९९९ मध्ये तिचं निधन झालं.
advertisement
8/9
१९४१ मध्ये 'कचा देवयानी' या चित्रपटातून तिने 'राजकुमारी' या नावाने पदार्पण केलं. तिने त्या काळातील तामिळ सिनेसृष्टीतील पाच सुपरस्टार्ससोबत काम करण्याचा मान मिळवला. यात त्यागराजा भगवतार, पी. यू. चिन्नाप्पा, टी. आर. महालिंगम, एमजीआर आणि शिवाजी गणेशन यांचा समावेश आहे.
advertisement
9/9
विशेष म्हणजे, एमजीआर आणि शिवाजी गणेशन हे दोन्ही दिग्गज फक्त एकाच चित्रपटात, 'कूंडुकिली' मध्ये, एकत्र दिसले होते आणि तो चित्रपट राजकुमारीनेच तिच्या भावासोबत मिळून 'आरआर पिक्चर्स' च्या बॅनरखाली बनवला होता. चेन्नईमध्ये तिच्या नावाने एक थिएटरही होतं.
advertisement
जितेंद्रच्या हिरोइनचं गाणं, 40 वर्षांनंतरही ऐकून प्रत्येक आईचे हृदय तुटतं, मुलीही ऐकून रडतात
जितेंद्रच्या हिरोइनचं गाणं, 40 वर्षांनंतरही ऐकून प्रत्येक आईचे हृदय तुटतं
    View All
    advertisement