'10 मिनिटं ते लोक', उर्फी जावेदच्या घरी मध्यरात्री 2 तरुणांचा भयंकर प्रकार, पोलीस आले तरी...
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Urfi Javed : आपल्या फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या घरी मध्यरात्री साडे तीन वाजता 2 अनोळखी व्यक्तींनी घरात घुसण्याचा प्रयत्न केला आहे.
'फॅशन क्वीन' उर्फी जावेद कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. बहुतेक वेळा ती तिच्या फॅशन सेन्स आणि बोल्डपणामुळे प्रसिद्धीझोतात असते. पण यावेळी तिने स्वतःचा एक भीतीदायक अनुभव सांगितला आहे. उर्फी सध्या खूप घाबरलेली आहे. अर्ध्या रात्री दोन अनोळखी व्यक्तींनी तिच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
उर्फी जावेदने सांगितले की जेव्हा दोन लोक सतत 10 मिनिटे डोअरबेल वाजवत होते. तेव्हा ती बाहेर जाऊन पाहायला गेली. तिने सांगितले की बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीने तिला दरवाजा उघडायला सांगितले आणि घरात येण्याचा आग्रह धरला. दुसरी व्यक्ती घराच्या एका कोपऱ्यात उभी होती. उर्फीने त्यांना तिथून निघून जायला सांगितले, पण त्यांनी नकार दिला. त्यानंतर तिने पोलिसांना फोन करेन असा इशारा दिला.
advertisement
advertisement
उर्फी म्हणाली की, रात्री 3 वाजता एखादी व्यक्ती एखाद्या मुलीच्या घराबाहेर उभी राहून दरवाजा उघडायला सांगते आणि निघून जायलाही नकार देते तर ते कुणासाठीही भीतीदायक असते. विशेषतः एकटी राहणाऱ्या मुलीसाठी ही परिस्थिती खूपच धोकादायक आणि भयानक असते. उर्फी जावेदने या प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तिला स्वतःबद्दल असुरक्षित वाटत आहे. तिच्या विरोधात काय कारवाई होणार, हे तिला जाणून घ्यायचे आहे, असे तिने सांगितले. उर्फीच्या सुरक्षेबाबत तिचे चाहतेही चिंतेत आहेत.










