Girija Oak's Husband : 24 तासांत देशाला लावलंय याड... इंटरनेट सेन्सेशन बनलेल्या गिरीजा ओकचा पती करतो तरी काय?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
National Crush Girija Oak's Husband : इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या ३७ वर्षीय सुंदरीचा पती कोण आहे आणि तो काय करतो, याबाबत प्रत्येकालाच उत्सुकता लागून राहिली आहे.
मुंबई: मराठी अभिनेत्री गिरिजा ओक-गोडबोले सध्या एका व्हायरल व्हिडिओमुळे रातोरात नॅशनल सेन्सेशन बनली आहे. तिच्या आकाशी साडीतील लूक आणि मनमोहक संवादशैलीवर चाहते फिदा झाले आहेत. मात्र इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या ३७ वर्षीय सुंदरीचा पती कोण आहे आणि तो काय करतो, याबाबत प्रत्येकालाच उत्सुकता लागून राहिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पुढे एका प्रोजेक्टच्या कामासाठी सुहृदने जेव्हा गिरिजाला फोन केला, तेव्हा आवाज ऐकून 'पन्नाशीतील व्यक्ती बोलतेय' असे गिरिजाला वाटले होते. गोव्यात शूटिंगदरम्यान दोघांची प्रत्यक्ष भेट झाली. गिरिजाने सांगितले, "आम्ही गोव्यात काही खरेदी करत असताना, बिलिंग करताना दोघांचीही गणिताची बोंब असल्याचे लक्षात आले. तेव्हाच आमचे ठरले की आमच्या नावडी सेम आहेत."
advertisement
advertisement
गिरिजा आणि सुहृदला साधे रजिस्टर लग्न करायचे होते. तिचा लग्नाच्या खर्चाऐवजी युरोप ट्रिप करण्याचा विचार होता. यावर गिरिजाचे सासरे श्रीरंग गोडबोले यांनी तर "तुम्ही पळून जाऊन कोर्टात लग्न करा, म्हणजे कोणालाच खर्च नको!" असा मजेशीर सल्ला दिला होता. अखेर, गिरिजा आणि सुहृद यांनी कुटुंबिय आणि मित्रपरिवाराच्या साक्षीने २०११ साली लग्नगाठ बांधली.


