Monsoon Tips : पावसात छत्रीवर सुद्धा वीज पडू शकते का? मोबाईल बंद ठेवायचा?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Monsoon Tips: वादळी पावसात विजा कोसळण्याचा धोका अधिक असतो. विजा चमकत असताना काय काळजी घ्यावी? हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊ.
यंदा ऐन मे महिन्यातच वादली पावसाने थैमान घातले. मराठवाड्यासह राज्यातील काही भागात विजा कोसळल्याने काहींना जीव गमवावा लागला. विजा पडण्याच्या घटना अलिकडे वारंवार घडत आहेत. त्यामुळे अशा काळात योग्य ती काळजी घेण्याची गरज आणि काय काळजी घ्यावी? याबाबत पुण्यातील हवामान शास्त्रज्ञ डॉ.एस. डी. सानप यांनी माहिती दिली आहे.
advertisement
पावसाळ्यात ढगांच्या घर्षणाने तयार होणाऱ्या विजा जमिनीकडे येतात. विशेषत: झाडांवर विजा पडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पावसात झाडाखाली थांबल्याने विजेचा धोका वाढतो. त्यासाठी बाहेर असताना उघड्यावर थांबू नये, त्वरित सुरक्षित ठिकाणी जावे. उंच झाडांच्या खाली, टेकड्यांवर थांबणे टाळावे, असे सानप सांगतात.
advertisement
आपण शेतात असातनाच विजा कडकडायला लागल्यास दोन्ही पाय गुडघ्याजवळ घेऊन बसावे. कान झाकावेत आणि जमिनीशी शक्यतो कमी संपर्क ठेवावा. घरात असताना सर्व विद्युत उपकरणे बंद ठेवावीत. हेयरड्रायर, मिक्सर किंवा इतर इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर या काळात टाळावा. खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवावेत आणि त्यांच्याजवळ उभे राहू नये.
advertisement
विजांच्या कडकडाटात शक्य असल्यास टेलिफोन वापरणे टाळावे. मोबाइल फोनचा वापर देखील टाळावा, विशेषतः उघड्यावर असताना लोखंडी रॉड असलेल्या छत्र्या, चाकू, स्टीलची भांडी यांपासून दूर राहावे. धरण, तलाव, नद्या यांसारख्या जलस्रोतांच्या आसपास जाणे टाळावे. सायकल, दुचाकी किंवा उघड्या ट्रॅक्टरवरून प्रवास करू नये, असे डॉ. सानप सांगतात.
advertisement
अंगावर वीज पडण्याची शक्यता वाटत असेल तर, अंगावर शहारे येणं, केस उभे राहणं किंवा त्वचेला झिणझिण्या येणं अशी लक्षणे जाणवतात. तेव्हा त्वरित जमिनीवर ओणवे व्हावे किंवा गुडघ्यात मान घालून सुरक्षित स्थितीत बसावे. अशा प्रसंगी कोणत्याही धातूच्या वस्तूंपासून किंवा उघड्या जागांपासून दूर राहणे सर्वात सुरक्षित ठरते, अशी माहितीही हवामान शास्त्रज्ञ डॉ.एस. डी. सानप यांनी दिली आहे.