महिलांच्या शरीरातील सर्वात उष्ण अवयव कोणता? तज्ज्ञांचं उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल चकित!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
महिलांच्या शरीरात काही असे अवयव आहेत, ज्यांचं तापमान सामान्य शरीराच्या तापमानापेक्षा जास्त असल्याचं सिद्ध झालं आहे. महिलांच्या शरीरातील सर्वात उष्ण भाग कोणता आहे आणि त्यामागची कारणं काय आहेत, हे जाणून घेऊया...
advertisement
advertisement
वैज्ञानिक संशोधनानुसार, महिलांच्या शरीरातील सर्वात उष्ण भाग म्हणजे गर्भाशय. गर्भाशय प्रजनन प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि सततच्या हार्मोनल ऍक्टिव्हिटी आणि रक्तप्रवाहामुळे ते गरम राहतं. शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत इथलं तापमान सरासरी जास्त आढळतं. सामान्य मानवी शरीराचं तापमान सुमारे 98.6°F (97°C) असतं. मात्र, शारीरिक हालचाली, वय आणि शरीराच्या भागावर अवलंबून हे तापमान दिवसभरात किंचित बदलू शकतं.
advertisement
महिलांच्या गर्भाशयाचं तापमान सामान्य शरीराच्या तापमानापेक्षा किंचित जास्त असतं. ओव्हुलेशन (अंडोत्सर्ग) आणि गर्भधारणेदरम्यान ते वाढतं. गर्भाशयाचं सरासरी तापमान सुमारे 100.4°F (98°C) असतं. हार्मोनल ऍक्टिव्हिटी, रक्तप्रवाह आणि पेशींच्या कार्यामुळे हे तापमान जास्त असतं. ओव्हुलेशनदरम्यान, बेसल बॉडी टेंपरेचर (BBT) सुमारे 0.5°F ने वाढतं, ज्यामुळे गर्भाशयाच्या भागातील तापमान किंचित वाढतं. गर्भधारणेदरम्यान हे तापमान अधिक स्थिर राहतं.
advertisement
गर्भाशयात जास्त उष्णता असण्याची मुख्य कारणं म्हणजे जलद रक्तप्रवाह, हार्मोनल ऍक्टिव्हिटी आणि मासिक पाळीशी संबंधित क्रिया. हा अवयव गर्भाधानासाठी तयारी करत असतो, त्यामुळे इथे पेशींची हालचाल जास्त होते. मासिक पाळी, ओव्हुलेशन आणि गर्भधारणेदरम्यान इथली ऍक्टिव्हिटी आणि रक्तसंचार आणखी वाढतो, ज्यामुळे तापमान सामान्यपेक्षा जास्त होतं.
advertisement