Ratnagiri : गोवा भुईकोट किल्ल्याची तटबंदी ढासळली, बुरुजाचे दगडही कोसळले; पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
शिवाजी गोरे, रत्नागिरी : गोवा या भुईकोट किल्ल्याचे बुरुज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ठीक ठिकाणी किल्ल्याची तटबंदी ढसाळत आहे.
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हर्णै गावात चार किल्ले आहेत. मात्र पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे या किल्ल्यांची मोठ्या प्रमाणात पडझड सुरू आहे. पाण्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्यावर वॉच ठेवण्याची महत्त्वाची भूमिका बजावणारा किनाऱ्यावरचा गोवा किल्ल्याची अलीकडे मोठ्या प्रमाणात पडझड सुरू आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
बंदरापासून अगदी जवळच असणारे फत्तेगड कनकदुर्ग गोवा किल्ला पर्यटकांचे खास आकर्षण आहेत. दरवर्षी लाखो पर्यटक या किल्ल्यांना भेटी देत असतात समुद्रातील सुवर्णदुर्ग किल्ला पर्यटकांचे खास आकर्षण आहे. त्याचबरोबर समुद्रकिनाऱ्यावर असणारा गोवा किल्ला सुद्धा तितक्याच तोडीचा असल्याने पर्यटक या ठिकाणी येऊन मनमुरादपणे आनंद लुटतात.


