Waterfalls Near Pune : 'मौसम मस्ताना,धबधबा जवळ असताना', पुण्याजवळचे धबधबे कधीच पाहिले नसतील, Photo
- Published by:Shreyas
Last Updated:
महाराष्ट्रामध्ये अखेर मान्सूनचं आगमन झालं आहे. पहिल्या दोन दिवसांमध्येच मुंबई-पुण्यात पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. पावसाला सुरूवात झाल्यामुळे आता अनेक जण विकएण्डला पिकनिकला जायचे प्लान करतात, पण नेमकं कुठे जायचं हे अनेकवेळा निश्चित होत नाही. पुण्याच्या जवळ असे अनेक धबधबे आहेत, जिथे जाऊन तुम्ही पावसाळा एन्जॉय करू शकता.
कुणे धबधबा : लोणावळा-खंडाळा भागात असलेला कुणे धबधबा पुण्यापासून 70 किमी अंतरावर आहे. कुणे धबधबा हा महाराष्ट्रातला सगळ्यात उंच धबधब्यांपैकी एक आहे. या धबधब्याचं पाणी 200 मीटर उंचीवरून खाली येतं. सकाळी सुरू होणारा कुणे धबधबा रात्री सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात येतो. कुणे वॉटर फॉलजवळ लोहगड आणि विसापूर हे दोन किल्लेही आहेत. लोणावळा स्टेशनवरून ऑटोरिक्षा कुणे धबधब्यावर घेऊन जातात.
advertisement
भिवपुरी धबधबा : कर्जत जवळ असलेल्या भिवपुरी धबधब्याबाबत कमी जणांना माहिती आहे. ट्रेकर्ससाठी पावसाळ्यामध्ये भिवपुरी धबधबा चांगला पर्याय आहे. भिवपुरी वॉटर फॉलजवळ पार्किंगची सोय आहे, पण धबधब्याजवळ पोहोचण्यासाठी 15 मिनिटांचा ट्रेक करावा लागतो. मध्य रेल्वेवर भिवपुरी स्टेशनवर उतरून रिक्षा 10-15 मिनिटांमध्ये धबधब्यापर्यंत सोडतात.
advertisement
ठोसेघर धबधबा : मान्सूनची पिकनिक प्लान करत असाल तर ठोसेघरही तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरेल. ठोसेघर धबधब्यातलं पाणी 200 मीटर उंचीवरून खाली येतं. तुमच्या पुढच्या रोड ट्रिपसाठी ठोसेघर धबधबा बेस्ट डेस्टिनेशन ठरू शकतो, कारण घाटामध्ये तुम्हाला निसर्गाचे सुंदर फोटो क्लिक करता येतील. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ठोसेघर धबधबा सुरू असतो. तुमच्याकडे स्वत:ची गाडी नसेल तर साताऱ्यावरून तुम्ही भाड्याच्या गाडीने ठोसेघरपर्यंत पोहोचू शकता.
advertisement
वजराई धबधबा : ठोसेघर प्रमाणेच वजराई धबधबाही सातारा जिल्ह्यात आहे. हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा धबधबा आहे. या धबधब्याची उंची 560 मीटर आहे. हा धबधबा कास पठारापासून फक्त 5 किमी अंतरावर आहे. ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी हा धबधबा उत्तम पर्याय ठरू शकतो. तुमच्याकडे कार असेल तर वजराई धबधब्यापर्यंत तुम्ही जाऊ शकता. अन्यथा साताऱ्यापर्यंत रेल्वे अथवा बसने जाऊन तिथून रिक्षाही मिळते.
advertisement
advertisement
ताम्हिणी धबधबा : पश्चिम घाटाच्या मधोमध पिरंगुल गावाजवळ असलेल्या ताम्हिणी घाटाचं सौंदर्य पावसात आणखी खुलून येतं. ताम्हिणी घाटातले धबधबे तुमचे डोळे दिपवून टाकतात, त्यामुळे पश्चिम घाटाचं सौंदर्य पाहण्यासाठी यंदाच्या मान्सूनमध्ये ताम्हिणी घाटाची पिकनिक प्लान कराच. पुण्याहून स्वत:च्या गाडीने किंवा बसनेही तुम्ही ताम्हिणी घाटापर्यंत पोहोचू शकता.
advertisement