Chia Seeds Benefits: मूर्ती लहान पण कीर्ती महान, ‘हे’ दाणे आहेत इतके शक्तीशाली, नियमित सेवनाने दूर पळतील गंभीर आजार, म्हातारपणातही राहाल फिट

Last Updated:
Benefits of Chia Seeds in Marathi: चियासीड्स किंवा शिया दाणे गेल्या काही वर्षांपासून भलतेच चर्चेत आहेत. मूर्ती लहान पण कीर्ती महान ही म्हण चिया बियांसाठी तंतोतंत लागू ठरते. म्हणूनच गेल्या काही वर्षांत त्यांची ओळख सूपरफूड अशी झालीये.दिसायला अगदी राई किंवा तिळ्याच्या आकाराची प्रत्येक बी ही पोषकत्वांनी परीपूर्ण अशी आहे. जाणून घेऊयात चियासीड्सचे आरोग्यदायी फायदे.
1/7
चियासीड्स या प्रोटिन्स, फायबर्स, ओमेगा 3 फॅटी ॲसिडस्, अँटिऑक्सिडंट्ससह इतर आवश्यक पोषक तत्वांनी परीपूर्ण असतात. याशिवाय त्यात असलेल्या दाहक गुणधर्मांमुळे रोज एक चमचाभर चियासीड्स खाणं आरोग्यासाठी फायद्याचं ठरू शकतं.

advertisement
2/7
चियासीड्समध्ये असलेले प्रोटिन्स शरीराच्या फायद्याचे ठरतात. यामुळे स्नायूंची झालेली झीज भरून निघते याशिवाय पेशींचं आरोग्य सुधारल्याने नवीन पेशी निर्माण व्हायला मदत होते.

3/7
चियासीड्समध्ये असलेल्या फायबर्समुळे अन्न पचायला मदत होते. त्याशिवाय भूक कमी लागते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी चियासीड्स हा एक कोणतंही साईड इफेक्ट नसलेलं एक सर्वोत्तम नैसर्गिक औषध ठरतं.

4/7
चियासीड्समध्ये असलेलं ओमेगा -3 फॅटी ॲसिड रक्तातल्या कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवतं. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहून हृदयाचं आरोग्य सुधारायला मदत होते.

5/7
चियासीड्समध्ये अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. यामुळे शरीराचं मुक्त रॅडिकल्सपासून रक्षण होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि संभाव्य आजारांचा धोका कमी होतो. याशिवाय शरीराचं मुक्त ऑक्सिडेटिव्ह तणावापासून रक्षण होतं.

6/7
चियासीड्सचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे.त्यामुळे ते खाल्ल्यानंतर रक्तात साखर हळूहळू सोडली जाते. त्यामुळे चियासीड्सच्या सेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यात मदत होते. डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी चियासीड्स खाणं फायद्याचं मानलं जातं.

7/7
चियासीड्समध्ये असलेली विविध पोषक तत्वं निरोगी त्वचा ठेवण्यास मदत करतात. यामुळे त्वचेतला ओलावा टिकून राहतो आणि वयोमानाप्रमाणे येणाऱ्या सुरकुत्याही कमी होतात.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement