Diwali Padwa : दारात काढा अशी झक्कास रांगोळी, बघूनच नवरा होईल खूश, देईल जबरदस्त गिफ्ट!

Last Updated:
Diwali Special Rangoli Designs : असं म्हणतात की, दिवाळीत साक्षात धनदेवता लक्ष्मी देवी पृथ्वीवर राहायला येते. त्यामुळे या सणानिमित्त सर्वत्र दिव्यांचा लखलखाट केला जातो. दारात रांगोळ्या काढून तोरणं बांधली जातात. वर्षभरात येणाऱ्या अत्यंत शुभ अशा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा पाडवा सणही दिवाळीत साजरा होतो. खरंतर हा नवरा-बायकोच्या प्रेमाचा सण. यानिमित्त दाराची शोभा वाढवण्यासाठी आपण काही सोप्या आणि हटके रांगोळी डिझाइन पाहणार आहोत. 
1/5
मोर हा अत्यंत शुभ पक्षी मानला जातो. मोराची नक्षी आणि त्यातले रंग अतिशय नेत्रदिपक असतात. ही रांगोळी दारात अगदी शोभून दिसते. आपण यंदाच्या पाडव्याला ही सुरेख रांगोळी काढून दाराची शोभा वाढवू शकता. (Image - instagram/fun_with_rangoli)

advertisement
2/5
हातावर मेहंदी काढायचं म्हटलं की, अनेकजण सुरुवातच फुलं आणि कुयरीनं करतात. हीच नक्षी रांगोळीतही शोभून दिसते. आपण घराच्या मुख्य दारापुढे किंवा अंगणात ही सुरेख रांगोळी काढू शकता. (Image - instagram/kolam.sindhuryaarulalan)

3/5
या रांगोळीची रचना हटके आणि आकर्षक आहे. आपण याआधी क्वचितच अशी रांगोळी काढली असेल. गुलाबी रंगाच्या विविध छटा यात पाहायला मिळतात. तसंच केशरी आणि पिवळा रंग छान एकत्र झाला आहे. उत्तम रंगसंगतीमुळे ही रांगोळी साधारण चमकदार दिसते. (Image - instagram/rangolibyjyotirathod)

4/5
लाल आणि हिरव्या रंगाच्या या डिझाइनमध्ये काढलेली रांगोळी अतिशय आकर्षक आणि सुरेख दिसतेय. ही रचना गुंतागुंतीची दिसत असली तरी अवघड नाहीये, आपण टूथपिक किंवा लहान काडीच्या सहाय्यानं रंगांमध्ये या रेषा पाडू शकता. (Image - instagram/rangoli_nation)

5/5
रांगोळीची ही रचनाही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळी आहे. पाना-फुलांची नक्षी असलेल्या या रांगोळीमुळे आपल्या दाराची शोभा नक्कीच वाढेल. त्याभोवतीच्या दिव्यांमुळे आणखी सुरेख लूक येईल. (Image - instagram/rangoli_nation)

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement