डोनाल्ड ट्रम्प यांच्या गर्वाचा फुगा फुटला! PM Modi यांनी ट्विट करत एका वाक्यात संपवला विषय
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अमेरिका-भारत टॅरिफ वादात तणाव वाढला, ट्रम्प यांनी मोदींना मित्र म्हटले, मोदींनी सकारात्मक प्रतिसाद दिला, संबंध सुधारण्याची शक्यता आहे.
भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत ते करु नये, यासाठी भारतावर ईर्षेपोटी अमेरिकेनं टॅरिफ लावला. त्यानंतर अमेरिका आणि भारत यांच्यात काही अंशी तणाव निर्माण झाला. या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी यूटर्न घेत मोदी आणि मी चांगले मित्र अशी पोस्ट सोशल मीडियावर केली. त्यानंतर पीएम मोदींनी देखील ट्रम्प यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देऊन एका वाक्यात विषय संपवला आहे.
ट्रम्प यांनी जे ट्विटमध्ये म्हटलं त्यांची प्रशंसा करत एका वाक्यात विषय संपवला. ट्रम्प यांनी नुकतंच भारत-अमेरिका संबंधांना अत्यंत खास असल्याचं म्हटलं होतं. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्यक्त केलेल्या भावना आणि भारत-अमेरिका संबंधांबद्दल केलेल्या सकारात्मक मूल्यांकनाचे मी मनापासून स्वागत करतो आणि त्याला तितक्याच आपुलकीने प्रतिसाद देतो. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अत्यंत सकारात्मक असून भविष्यातील दृष्टीकोन ठेवणारी व्यापक आणि जागतिक रणनीतिक भागीदारी असेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
Deeply appreciate and fully reciprocate President Trump\'s sentiments and positive assessment of our ties.
India and the US have a very positive and forward-looking Comprehensive and Global Strategic Partnership.@realDonaldTrump @POTUS https://t.co/4hLo9wBpeF
\— Narendra Modi (@narendramodi) September 6, 2025
advertisement
ट्रम्प यांची पोस्ट आणि पीएम मोदींनी एका वाक्यात दिलेलं हे उत्तर यामुळे भारत आणि अमेरिकेतील तणाव कमी होऊन पुन्हा मैत्रीपूर्ण करार होतील का? टॅरिफवर तोडगा निघेल का? हे पाहावं लागणार आहे. अमेरिकेचा गर्वाचा फुगा फोडण्यासाठी भारताने रशिया आणि चीन यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध अधिक चांगले करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे ट्रम्प यांचे सगळे इरादे पाण्यात गेले असून अखेर त्यांच्यावर यूटर्न घेण्याची वेळ आली.
advertisement
सध्याच्या तणावाच्या परिस्थितीतही पंतप्रधान मोदी त्यांचे मित्र राहतील आणि त्यांची मैत्री कायम राहील. त्यांनी मोदींना उत्कृष्ट पंतप्रधान आणि महान असल्याचेही म्हटले होते. मात्र, त्याच वेळी त्यांनी, मोदी सध्या जे करत आहेत, ते मला आवडलेले नाही, असंही म्हटलं होतं. दोन्ही देशांमधील टॅरिफ (आयात शुल्क) वादामुळे संबंध गेल्या दोन दशकांत सर्वात वाईट टप्प्यातून जात असताना ट्रम्प यांनी हे विधान केलं होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 06, 2025 10:48 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गर्वाचा फुगा फुटला! PM Modi यांनी ट्विट करत एका वाक्यात संपवला विषय